पोस्ट्स

एप्रिल, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

गाव : उब आणि धग

Chaprak April 19 * माझिया शिवारी घडो परिक्रमा.                     डाॅ. कैलास दौंड _____________________________ आपल्या जवळ काय काय आहे याचा माणसाला पुष्कळदा विसर पडतो. कधी कधी अती परिचयात अवज्ञा झाल्यासारखेही होते. गावातील एक -दोन मित्र वर्ष सहा महिन्यातून 'आपण मित्र मिळून कोठेतरी फिरायला जाऊ ' असे अनेकदा म्हणत असतात . त्यांच्या त्या विचारां मुळे सहाजिकच अंगात उत्साह संचारतो.  'मग आपण फिरायला कोठे जाणार? ' असे विचारताच त्यांचे उत्तर तयार असणार 'गोवा'. त्याला गोवा म्हणजे त्यातील फक्त पणजी , तेथील सागर किनारा बघायला खूप आवडतं. तिथला समुद्र किनारा, निसर्ग मनाला भावतो ,भूरळ घालतो. बाकिबाब बोरकरांच्या 'माझ्या गोव्याच्या भूमीत ' ही कविता आपोआप  ओठावर नाचू लागते. मग आम्ही इकडच्या तिकडच्या गप्पा करून विषय संपवतो. मी एकदा दोनदा पणजीस गेलोही पण या मित्रांसोबत काही जाणे झाले नाही.         का कुणास ठाऊक पण मला सतत वाटत आलेय की केवळ निसर्ग बघण्यासाठी ...

विशेष लेख

    ○ बीज जपावे उरात । मग पीक वावरात॥                    डाॅ. कैलास दौंड _________________________________________________________ गोष्ट बियांच्या जतनाची आहे. मागच्या महिन्यात सह्याद्रीच्या कुशीत असणाऱ्या अकोले- राजुर...