पोस्ट्स

मे, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विशेष लेख

इमेज
     ○ बीज जपावे उरात । मग पीक वावरात॥                    डाॅ. कैलास दौंड _________________________________________________________               गोष्ट बियांच्या जतनाची आहे. मागच्या महिन्यात सह्याद्रीच्या कुशीत असणाऱ्या अकोले- राजुरच्या डोंगराळ भागात गेलो होतो. दिवस उन्हाळ्याच्या आगमनाचे होते खरे परंतू तरीही त्या उंचीवर वाहणाऱ्या वाऱ्यामुळे हवा आल्हाददायक होती. पट्टा किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्याने कोंभाळणे गावातीलच पोपेरेवाडीच्या वळणावर असणाऱ्या एकुलत्या घराने माझे लक्ष वेधून घेतले. हे घर महाराष्ट्राची 'बीजमाता' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राहीबाई पोपेरे यांचे असल्याचे पाचपुते सरांकडून समजले. अर्थातच या ठिकाणी भेट देणे नक्की केले. म्हणून खिरविरे गावातून परततांना आवर्जून थांबून राहीबाईची भेट घेऊन तिचे घर, शेत व बीजसंग्रह पाहिला. सोबत असणाऱ्या दीपक पाचपुते या शिक्षक मित्रांची त्यांच्याशी चांगली ओळख होती.  ...