पोस्ट्स

मार्च, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

तुडवण : कादंबरीचे परिक्षण. संतोष जायभाये, पुणे.

इमेज
प्रा. संतोष जायभाये सरांनी गोव्यातील हेराल्ड वृत्तपत्राच्या रविवार पुरवणीत लिहीलेला लेख. 

सुरेंद्र पाटील यांचा #तुडवण कादंबरी वरील लेख अक्षरनामा वर वाचायलाच हवा.

इमेज
Marathi News  >>  अक्षरनामा  >>  home Friday, 21 Feb, 4.58 pm तुडवण : ग्रामीण महाराष्ट्रातील सुशिक्षितांच्या जगण्याची काटेरी शोकात्म व्यथा काही वर्षांपूर्वी बारावीनंतर डी.एड. केले की, तरुणांना मास्तरकीच्या चांगल्या संधी होत्या. बारावीनंतर दोन वर्षं झाले की, मुलं मास्तरकी करत जीवनमान बदलू लागली. मग डी.एड. कॉलेजेसचा बाजार इतका वाढला की, हजारो डी. एड. पदवीधारक बाहेर पडू लागले. त्यातून शासनाची धोरणं बदलली. डी एड. नंतर सीईटी, मग टीईटी पास केल्यानंतरही लाखोंचे डोनेशन दिल्यानंतरच त्यांचा विचार होऊ लागला. गरीब तरुणांसाठी हे अडचणीचं होते. पुढे अशा जागा भरणंही जवळजवळ थांबलं. त्यातून बेकारांची फौज गावोगावी निर्माण झाली. हजारो रुपये घालून शिकलेल्या या तरुणांच्या कुटुंबाची मुलाकडून घराला वर आणण्याची जी अपेक्षा असते, ती पाण्यात जायला लागली. त्यामुळे तरुणांचीच नव्हे त्या पूर्ण कुटुंबाची मानसिक, आर्थिक तुडवण व्हायला लागली. यातून प्रश्नांच्या साखळ्या वाढतच चालल्या. कैलास दौंड हे वर्तमानाला थेटपणे भिडणारे कादंबरीकार. 'पाणधुई', 'कापूसकाळ' या...