पोस्ट्स

ऑगस्ट, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

तुडवण - गावाकडच्या करपलेल्या स्वप्नांची .- बाबाराव मुसळे .

इमेज
    ●  तुडवण - गावाकडच्या एका अतिसामान्य कुटुंबाच्या करपलेल्या स्वप्नांची. - बाबाराव मुसळे.        कैलास दौंड यांची अलीकडेच मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेली 'तुडवण' कादंबरी नुकतीच वाचली. बीड जिल्ह्यातील  शिरूर कासार परिसरात घडणारी ही एका कुटुंबाच्या दयनीय वाताहतीची मन हेलावून टाकणारी दुर्दैवी कहाणी. मुळात बीड जिल्हा म्हटलं ,की शेतीसंबंधाने  कायम दुष्काळ .’इथं जगण्याची तीन नावं म्हणजे ‘बखाड,उन्हाळा आणि दुष्काळ’’असं लेखकाने पृष्ठ १९१ वर नमूद करून ठेवलेलं आहे . बखाड म्हणजे अल्पवृष्टी . त्यामुळेच कायम दुष्काळ .म्हणजे इथल्या लोकांच्या नशिबात बाराही महिने उन्हाळा . त्यामुळेच त्यांच्या दुःखाला पारावार राहत नाही . जगण्याच्या किमान अपेक्षाही इथं पूर्ण होत नाहीत. मुळात अवतीभोवती भव्य दिव्य प्रेरक असं काहीच नसल्याने अंगी बाळगलेली स्वप्नेही तशीच खुरटीच असतात .पण तीही पूर्ण करता येऊ नये एवढा दैवदुर्विलास नशिबी आलेल्या एका अतिसामान्य कुटुंबाची ही करूण कहाणी आहे. डि .एड . होऊन कुठेतरी शिक्षक म्हणून नोकरी करू. त्यामुळे घरच्यांच्या मुखा...