पोस्ट्स

एप्रिल, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

गुढीपाडवा (विशेष)

इमेज
     गुढीपाडवा   फाल्गुन सरूनी चैत्र आला   दारी उभारू गुढी   नववर्षाच्या स्वागताची   अशी वाढवू गोडी.   नवी पालवी लेऊन आला   सृष्टीचा हा मित्र   देणे उन्हाचे घेऊन आला   सुंदर महिना चैत्र.   देई सणाचा गोड गोडवा   सर्वा गुढीपाडवा   रूप गुढीचे साज साजरे   सांगे मोद वाढवा.    वस्र नवे लेऊनी नटली   विलोभनीय गुढी   कलश घेऊनी डोईवरती   स्वागत करते खडी.   कडूनिंबाचा मोहरा लागे   गुळासंगती गोडी   आरोग्याची घ्या काळजी   संदेश देते गुढी.   नव वर्षाच्या स्वागताचा   गुढीपाडवा सण   सौर वर्षाच्या प्रथम दिनाला   हे गोड निमंत्रण. ~~~~~ डॉ. कैलास दौंड kailasdaund@gmail.com