लक्षवेधी समीक्षा : बालसाहित्याचे वर्तमान.

लक्षवेधी समीक्षा : बालसाहित्याचे वर्तमान. इ.स.२००० नंतर मराठी बालसाहित्य निर्मितीचा ओघ वाढल्याचे चित्र आहे. अनेक लेखक कवींनी बालसाहित्यात कविता, कथा व क्वचित कादंबरीही लिहून भर टाकली आहे; मात्र त्या मानाने या बालसाहित्याची म्हणावी तेवढी समीक्षा झाली नाही. बालसाहित्याची समीक्षा करणारी पुस्तके अत्यल्प प्रमाणातच प्रकाशित झाली. या पार्श्वभूमीवर कवी, कादंबरीकार आणि बालसाहित्यिक म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या डॉ. कैलास दौंड यांचे लक्षवेधी ठरणारे 'बालसाहित्याचे वर्तमान' हे समीक्षेचे पुस्तक नुकतेच अहमदाबादच्या शॉपीजनने प्रकाशित केले आहे. 'बालसाहित्याचे वर्तमान' हे पुस्तक 'बालसाहित्याप्रती आस्था असणाऱ्या असणाऱ्या सर्वांना' त्यांनी अर्पण केलेले आहे. अर्थातच यातील सर्व लेखांना पुरेशी वाचनीयता देखील लाभलेली आहे. अभ्यासक, समीक्षक आणि बालसाहित्यिकांना हे लेख वाचून आनंद व दिशा मिळेल .तसेच अगदी किशोरवयीन वाचकही या पुस्तकामुळे वाचनाकडे वळायला मदत होईल. 'बालसाहित्याचे वर्तमान' या पुस्तकात एकूण अठरा लेख आहेत. त्यातील पहिला लेख आजच्या बालसाहित्यावर एक झोत टाकणारा...