शितल संखे : आनंददायी शिक्षणाच्या पाईक.
शितल संखे : आनंददायी शिक्षणाच्या पाईक. शीतल हर्षल संखे या पालघर जिल्ह्यातील शिक्षिका. सुरूवातीला त्या आदिवासी बहुल असलेल्या डहाणू तालुक्यात हिलीमपाडा येथे रूजू झाल्या. त्यानंतर तीन वर्षांनी पालघर तालुक्यातील शिगाव येथे दहा वर्षे उत्तम सेवा केल्यानंतर आता त्या पालघर तालुक्यातीलच जिल्हा परिषद सरकारी मत्स्यशाळा नवापूर येथे सहा वर्षापासून कार्यरत आहेत. या संपूर्ण सेवाकाळात शाळा आणि विद्यार्थ्यांशी एकरूप होऊन त्यांनी उत्साहाने उत्तम कार्य केले. त्यांच्या शाळेतील पटसंख्या 67 असून इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग आहेत. त्या पहिली व दुसरीच्या वर्गांना अध्यापन करतात. या वर्गात एकतीस विद्यार्थी आहेत. शिक्षकांची शाळेतील प्रत्येक कृती विद्यार्थ्यांना आनंद देणारी असावी असे त्यांचे धोरण आहे. विद्यार्थी लेखन ,वाचन , गणिती क्रिया यात पारंगत व्हावेत यासाठी त्यांनी त्यांच्या शाळेत काही उपक्रम नियोजनपूर्वक राबवले आहेत. त्यांचा चांगला उपयोग विद्यार्थ्यांना होतांना पाहून त्या उत्साहाने उपक्रमात आणि अध्यापनात रममाण होतात. त्या राबवीत असलेले उपक्रम असे आहेत- मराठी विषयासाठी - म...