पोस्ट्स

जून, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कवी विचार मंच, शेगाव आयोजित तिसऱ्या राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षीय भाषण. अध्यक्ष डाॅ. कैलास दौंड

इमेज
[ कवी विचार मंच, शेगाव आयोजित कोकमठाण(शिर्डी), येथे २ जून रोजी झालेल्या  तिसऱ्या राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षीय भाषण.  अध्यक्ष - डॉ. कैलास दौंड ] काव्य रसिक बंधू भगीनींनो नमस्कार, कवी विचार मंच ,शेगाव आयोजित या कोकमठाणच्या भूमीत संपन्न होत असलेल्या तिसऱ्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून आपणाशी संवाद साधतांना मनस्वी आनंद होत आहे. याचे कारण म्हणजे कवितेच्या एका समान धाग्याने आपण गुंफले गेलो आहोत.        भाषेत जेव्हा गद्य नव्हते तेव्हा पद्य अस्तित्वात होते हे आपल्याला प्राचीन ग्रंथातून प्रचितीस येते. माणसाच्या हृदयाला सहज जाऊन भिडणारी, त्याच्या मनाशी, अंतर्मनाशी संवाद करणारी कविता ही एक मनस्वी अभिव्यक्ती आहे. कवी विचार मंच, शेगाव अशा अभिव्यक्तीशी निष्ठावान असलेला काव्य समुह आहे. म्हणून ओळीने तीन उत्कृष्ट साहित्य संमेलनाचे आयोजन करणारा, प्रातिनिधिक संग्रह प्रकाशित करणारा, दर्जेदार साहित्यकृतींना आणि निष्ठावंतांना गौरविणारा हा मंच आजच्या काळातील माय मराठीच्या कंठातील तेजस्वी आभूषण आहे.     ...