पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

'मातीचे अत्तर

इमेज
  •'मातीचे अत्तर' : निसर्गरूपाचे विलोभनीय दर्शन घडवणारा हायकू संग्रह.                               डाॅ. कैलास दौंड. 'मातीचे अत्तर' नावाचा राजन पोळ यांचा नवाकोरा हायकू संग्रह नुकताच संवेदना प्रकाशनाने प्रकाशित केला आहे. एकुणच जपानचा हायकू आता मराठी मातीत बर्‍यापैकी बाळसे धरू लागलेला आहे. तो देखणा आणि भावतरल होत होत नेमक्या अक्षरातही अवतरत आहे. अल्पाक्षरत्व हे तसे एकूणच कवितेचे व्यवच्छेदक लक्षण मानले गेले असले तरी सद्ध्याच्या पसरट आणि गद्यात्म स्वरूपाच्या कवितेमुळे रसिकवाचकांनी कवितेकडे पाठ फिरवल्याचेही कधीकधी नजरेस येते. तर यमक, छंद आणि लघूगुरू यांच्या तांत्रिकतेत अडकलेली व बर्‍यापैकी वाढत असलेली बहुतांश मराठी गझल आपला प्रभाव आणि परिणाम दाखवू शकत नाही. अर्थात मोजकी व सकस गझल लिहिणारी चार सहा नावेच मराठीतील उत्तम गझलकार म्हणून ओळखली जातात. मध्यंतरी 'चारोळी' काव्यप्रकाराने युवावर्गाला भूरळ घातली होती. 'हायकू' हा त्याही पेक्षा लहान काव्यप...

कापूसकाळ : एक समीक्षा लेख

इमेज
 

महाराष्ट्र साहित्य पत्रिका, अंक जुलै ते सप्टेंबर २०२० मधील 'तुडवण कादंबरी ची समीक्षा.

इमेज