पोस्ट्स

जून, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

🔰 शेती मातीची गत अवगत असलेल्या कविता.

इमेज
  🔰 शेती मातीची गत अवगत असलेल्या कविता.                          ✒ इंद्रजीत भालेराव.         कवीमित्र कैलास दौंड यांचा  ' आगंतुकाची स्वगते ' हा पाचवा कवितासंग्रह या वर्षाच्या (२०२१) सुरुवातीलाच आलेला आहे. या आधी त्यांचे 'उसाच्या कविता', 'वसाण' , 'भोग सरू दे उन्हाचा' आणि 'अंधाराचा गाव माझा' असे चार कवितासंग्रह आलेले आहेत.  त्यांची बऱ्यापैकी चर्चाही झालेली आहे.  ' भोग सरू दे उन्हाचा ' या त्यांच्या संग्रहाला मी सविस्तर प्रस्तावनाही लिहिलेली  आहे.   त्यांच्या काही सुभाषितवजा ओळी मी नेहमीच माझ्या कार्यक्रमात सादर करत आलोय. त्यांना उत्तम दादही मिळत आली आहे. त्यांच्या कविता लेखनाचा हा प्रवास मागच्या पंचवीस वर्षाचा आहे. या शतकाच्या सुरुवातीलाच त्यांचा पहिला संग्रह प्रकाशित झाला होता.          कैलास दौंड हे उत्तम कादंबरीकार ही आहेत. त्यांच्या 'पाणधुई ' ,  'कापूसकाळ ' आणि 'तुडवण' अशा तीन कादंबऱ्याही आहेत. कवितेपेक्षा त्यांच्या कादंबऱ्यांची जास्त चर...