पोस्ट्स

डिसेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

• वंजारी समाजातील साहित्यिकांचे मराठी साहित्यातील योगदान.

इमेज
     वंजारी समाजातील  साहित्यिकांचे मराठी साहित्यातील योगदान.             वंजारी सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संस्थेमार्फत नाशिक येथे पहिले साहित्य संमेलन होत आहे. या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रथमच वंजारी समाजातील साहित्यिक एकत्र जमत आहेत. संस्थेचे साहित्य संमेलन असल्याने सर्वच साहित्यिक त्यात सहभागी होतील असे नाही. तरीही सहभागी होणाऱ्या सर्वांना माहीती व्हावी या उद्देशाने काही साहित्यिकांच्या लेखन कार्याचा परिचय देणे आवश्यक वाटते. लिहीणारा लेखक खास करून साहित्यरूपातून सर्वांसाठी लेखन करत असतो. जात, पात, धर्म, प्रांत असा कुठलाही भेद चांगले साहित्यिक करत नसतात. किशोर सानप, बाबाराव मुसळे, डॉ.कैलास दौंड, राजेंद्र मुंढे, भास्कर बडे, एकनाथ आव्हाड, विवेक उगलमुगले,वा.ना.आंधळे , मनोहर आंधळे,बाळासाहेब गर्कळ इत्यादींच्या लेखनातून ते दिसते.       विशिष्ट  समाजाची साहित्य संमेलने व्हावीत पण साहित्यिकांनी त्या त्या समाजापुरते मर्यादित राहू नये. तर आपले लेखन व्यापक समाज घटकां...