• वंजारी समाजातील साहित्यिकांचे मराठी साहित्यातील योगदान.
वंजारी समाजातील साहित्यिकांचे मराठी साहित्यातील योगदान.
वंजारी सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संस्थेमार्फत नाशिक येथे पहिले साहित्य संमेलन होत आहे. या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने प्रथमच वंजारी समाजातील साहित्यिक एकत्र जमत आहेत. संस्थेचे साहित्य संमेलन असल्याने सर्वच साहित्यिक त्यात सहभागी होतील असे नाही. तरीही सहभागी होणाऱ्या सर्वांना माहीती व्हावी या उद्देशाने काही साहित्यिकांच्या लेखन कार्याचा परिचय देणे आवश्यक वाटते. लिहीणारा लेखक खास करून साहित्यरूपातून सर्वांसाठी लेखन करत असतो. जात, पात, धर्म, प्रांत असा कुठलाही भेद चांगले साहित्यिक करत नसतात. किशोर सानप, बाबाराव मुसळे, डॉ.कैलास दौंड, राजेंद्र मुंढे, भास्कर बडे, एकनाथ आव्हाड, विवेक उगलमुगले,वा.ना.आंधळे , मनोहर आंधळे,बाळासाहेब गर्कळ इत्यादींच्या लेखनातून ते दिसते.
विशिष्ट समाजाची साहित्य संमेलने व्हावीत पण साहित्यिकांनी त्या त्या समाजापुरते मर्यादित राहू नये. तर आपले लेखन व्यापक समाज घटकांसाठी उपयुक्त ठरावे. यासाठी प्रयत्न करावेत. हे ही या ठिकाणी आवर्जून सांगितले पाहीजे. वर उल्लेख केलेले साहित्यिक कधीही कोणत्याही मर्यादित अडकलेले नाहीत तर ते महाराष्ट्राचे साहित्यिक आहेत आणि राहतीलही.
या पहिल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कवी प्रा. वा. ना. आंधळे यांची निवड झालेली असून ख्यातनाम कादंबरीकार बाबाराव मुसळे हे उद्घाटक आहेत. प्रशांत आंधळे स्वागताध्यक्ष आहेत.
मराठी कादंबरीच्या प्रांताकडे एक कटाक्ष टाकल्यास पखाल, वारूळ, हाल्या हाल्या दुधू दे, पाटीलकी,स्मशानभोग,दंश,झळाळ, आर्त, एक पाऊल पुढं,नो नॉट नेव्हर, द लास्ट टेस्ट या कादंबऱ्या़चे कादंबरीकार बाबाराव मुसळे यांचे नाव अग्रभागी दिसते. त्याआधी अरूणोदय, मनोरा, कमळाच्या कळ्या, निखळलेला तारा, मृगजळ, चंदनाचे खोड, केवड्याचे कणीस, रसिका सरीता सागर कादंबऱ्या लिहीणारे दि. गो. मुंढे दिसतात. मात्र त्यांच्या लेखनाला सार्वत्रिक प्रसिद्धी मिळाल्याचे दिसत नाही. पांगुळवाडा, भुवैकुंठ, हारास या किशोर सानप कादंबऱ्या लिहील्या आहेत. कवी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या कैलास दौंड यांच्या पाणधुई, कापूसकाळ, तुडवण या कादंबऱ्या लक्षवेधी ठरल्या आहेत. पोटऱ्यातलं कणीस ही अंबादास केदार यांची कादंबरी आहे. उचल, रहस्य ,जगावेगळं नातं या कादंबऱ्या लिहून बाळासाहेब गर्कळ यांनी आपले स्थान पक्के केले आहे. प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे यांची घालमेल ही कादंबरी तरूणांना दिशा देणारी आहे.नागेश कांगणे यांची झुंज आमदाराची व आकांत ही रंजना सानप यांची कादंबरी वाचकांना आवडणारी आहे. हिरवा डोंगर या कांदबरीतून दिनकर जायभाये यांनी ऊसतोडणी कामगार कुटूंबाचे दर्शन घडविले आहे. नारायण मुंढे यांची ' मागे फिरा पतंगांनो' ही कादंबरी लक्ष वेधून घेणारी आहे. 'पाणकणसं' ही प्रा. डॉ. भास्कर बडे यांची गाजलेली कादंबरी. पद्माकर दराडे यांनी डबल बेल, इपरीत या कादंबऱ्या लिहिल्या आहेत.
मराठी कथेच्या प्रांतात 'झिंगू लुखू लुखू', 'मोहरलेला चंद्र', 'नगरभोजन' या बाबाराव मुसळे यांच्या कथासंग्रहांनी लोकप्रियता गाठली. इतर कथाकारांत दि. गो. मुंढे -विखुरलेल्या पाकळ्या , भास्कर बडे यांचे पांढर, चिकाळा, खिलाऱ्या, बाईचा दगड कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. कैलास दौंड यांचा एका सुगीची अखेर , अंबादास केदार यांचे
येस्कर चिपाट,चऱ्हाट, उतरकरी,काकऱ्या हे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. सोपान हाळमकर यांचा ' सपान' नावाचा कथासंग्रह अलिकडेच प्रकाशित झाला आहे तर द्वारका गीते, मुंढे यांनी स्नेहबंध तर लता गुठे यांनी शोध अस्तित्वाचा, साटंलोटं हे कथासंग्रह लिहीले आहेत. झोका हा कथासंग्रह प्रा. डॉ. सुभाष शेकडे यांनी लिहीला आहे. रामदास केदार यांचे ,पोखरून पडलेली माणसे हा कथासंग्रह प्रकाशित झालेला आहे. नागनाथ पाटलोबा बडे यांचा झाले ते झाले हा कथासंग्रह प्रकाशित आहे.
एकूणच मराठी कविता जशी पसरट आणि संख्येने अधिक आहे तसेच चित्र इकडेही पहावयास मिळते दिवंगत कवी शंकर बडे यांचे इरवा,मुगुट,सगुन हे कवितासंग्रह मराठी कवितेत मानाचे स्थान मिळवून बसले आहेत. सत्यकथामध्ये लिहिणारे प्रसिद्ध कवी सोपान हाळमकर यांचे आक्रोश आणि आक्रोश नंतरच्या कविता हे दोन कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. बी. ई. आव्हाड यांचाही मरूद्यान हा कवितासंग्रह प्रकाशित झालेला आहे. वा. ना. आंधळे यांचा 'फर्मान आणि इतर कविता' , किशोर सानप यांचा ऋतू हा कवितासंग्रह तर उसाच्या कविता, वसाण, भोग सरू दे उन्हाचा, अंधाराचा गाव माझा, आगंतुकाची स्वगते - हे कैलास दौंड यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. संत भगवानबाबा यांच्या विषयी कवितांचा दयानिधी संत ते हा कवितासंग्रह प्रकाशित आहे,नारायण खेडकर यांचे ग्रीष्मगंध आणि आभाळ वेदना हे कवितासंग्रह वाचकांना आवडणारे आहेत. विवेक उगलमुगले यांचे आतला आवाज , दिवाण्या आणि तोड्या,सायकल वरच्या कविता,प्रिय आई बाबांच्या शोधात,आठवणींची फुलं, सांगावेसे वाटते म्हणून हे कवितासंग्रह महत्त्वाचे आहेत. सौरभ, लेकी तुझ्यासाठी, डोळ्यात कालचे पाणी हे कवितासंग्रह लिहुन मनोहर ना. आंधळे यांनी मराठी कवितेत आपले स्थान निर्माण केलेले आहे. तिफण या वाङ्मयीन त्रैमासिकाचे संपादक प्रा. शिवाजी हुसे यांचे बाप झाला कासावीस, वेदनांचा गाव हे ग्रामीण जगण्यांच्या कष्टमय छटा, नवी आव्हाणे अधोरेखित करणारे कवितासंग्रह आहेत. बाबाराव मुसळे(इथे पेटली माणूस गात्रे) , भास्कर बडे (वावर), द्वारका गीते, मुंढे (नवांकूर) , सत्यभामा जाधवर(स्वप्नगंध) ,बाळासाहेब गर्कळ (बापाच्या कविता), कॉ. का.वा.शिरसाठ ( गावगाडा ते राजवट), एकनाथ काशिनाथ कराड (भगवान बाबा व वामनभाऊ चरीत्र),सिंधूताई दहिफळे -(भीजव सारा गाव) , लता गुठे ( मन सैरभैर मात्र, हुंकार अस्वस्थ जाणिवांचे, जगण्याच्या आरपार, जीवन वेल), शिवा कराड (यादगीरी) , अलकनंदा आंधळे (काव्यनंदा), जना घुले, नागरगोजे (रंग मनामनांचे, भावपिसारा), रंजना सानप (निशब्द, सतेज), राजकुमार मोरगे (तू थेंब भरल्या नभातला), संजय गर्कळ (झरा जाणिवांचा), विलास पालवे (बेलापूर) , चंद्रकांत पालवे (तृण अग्नीमेळे ), शीतल संख्ये (शिवदुलारी) (गुंजन, मोरपिसी स्वप्न), रामदास केदार (बीनबुडाची माणसं, बैल दौलतीचा धनी) , संपत गर्जे(शब्द आशयाचे घन) ,अनंत कराड (काळ्याई), लक्ष्मण खेडकर(लावण्याची चंद्रकोर, झाडाला फुटले पाय),रमेश आव्हाड ( वर्दीतल्या कविता), सुषमा सांगळे वनवे (किमयागार) , गणेश आघाव ( बारभाईतल्या कविता, मातीच्या कविता, मातीला फुटलेला हात, आघाववाडीची गाणी), नागनाथ पाटलोबा बडे (अंगण, मनातलं गाव) तर गझलेच्या प्रांतात जयदीप विघ्ने (रूईची फुले, भोंगळा पाऊस),सतीश दराडे(श्वासांच्या समीधा,कैदखाण्याच्या छतावर )संग्रह रसिकांना आवडलेले आहेत.हे सर्व कवी आणि कंसातील त्यांचे कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्याखेरीज पुस्तके प्रकाशित नसलेले सुमन मंगेश आव्हाड, मनीषा बडे-ढाकणे, सुरेखा सूर्यकांत डोंगरे, संदीप ढाकणे,अनंत मुंढे चंद्रकांत धस, छाया जायभाये, कल्पना घुगे, इ. अनेक जण कवितालेखन करत आहेत.
वैचारिक आणि समीक्षात्मक लेखनातही काही मान्यवर लेखकांनी आदर्श निर्माण केलेले आहेत. त्यात 'महात्मा फुले यांचे शूद्रातिशूद्रांविषयी विचार' हे पुस्तक सुलभा मुंंडे जाधवर यांनी लिहून वैचारिक लेखनाला सुरूवात केली. किशोर सानप यांचे 'युगपुरुष तुकाराम, समग्र तुकाराम दर्शन ही पुस्तके विद्वतमान्य ठरली आहेत. साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ यांची थर्ड ॲंगल, सम्यक सकारात्मक, मला प्रभावित करून गेलेला सिनेमा ही महत्त्वाची पुस्तके लिहिली आहेत. प्रा.डॉ.रामकिशन दहिफळे यांनी लोकमाता अहिल्यादेवी होळकर : चरित्र व कार्य हे पुस्तक लिहून मोठे कार्य केले आहे. प्रा. राजेंद्र मुंढे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी, राष्ट्रसंतांचे मौलिक विचार , डॉ. किशोर सानप : व्यक्ती आणि वाङयम ही महत्त्वाची पुस्तके लिहिली आहेत व त्याची सर्वदूर दखलही घेतली गेलेली आहे. कॉ. का. वा. शिरसाठ यांच्या पत्रकांचे 'वाटचालीचा प्रश्न' हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झालेले आहे. मच्छिंद्र नागरे यांनी डॉ. बापुजी साळुंके आणि मराठवाडा , राजन खान आणि समकालीन कथाकार , अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि आम्ही पाचजणी, संस्थाामाता सुशीलादेवी साळुंखे ही पुस्तके लिहिली आहेत. लता गुठे यांच्या मना मना दार उघड या पुस्तकाने या प्रांतात हजेरी लावली आहे. किशोर सानप यांनी युगांतराची कविता हा व इतर अनेक समीक्षा ग्रंथ लिहिलेले आहेत. अशोक बांगर हे व्याख्याते आहेत, त्यांनी राष्ट्र भूषण, स्वराज्याचे शिलेदार, भारत भूषण, पावनखिंड, झुंज पुरंदराची, शाहिस्तेखानावर छापा, शिवप्रताप, शिवपर्व आदी पुस्तके लिहिली आहेत. डॉ. अशोक घोळवे यांनी चिकाळा दलित ग्रामीण साहित्याचे सीमोल्लंघन, अनुराधा वैद्य यांचे साहित्य एक अभ्यास, उंदरीन सुंदरीन एक अभ्यास ही पुस्तके प्रसिद्ध आहेत.सिंधूताई दहिफळे यांनी मानवतेचे पाईक, व्यसनासी दोन हात, अग नारी, घे उंच भरारी ही पुस्तके लिहिली आहेत. प्रा. डॉ. सुभाष शेकडे सरांनी भलरी, आतमध्ये कीर्तन, दळण दळीते दळीते धर्म माझा जागविते, विरंगुळ्याची गाणी असे लोकसाहित्य विषयक अनेक ग्रंथ लिहिले आहेत. स्वातंत्र्य शाहिर कुंजविहारी यांच्या कवितेवरील त्यांनी केलेले संशोधन प्रसिद्ध आहे.
तुकाराम निती हे सदर लेखन प्रा. डॉ. विठ्ठल खंडुजी जायभाये यांनी केलेला आहे.' तऱ्होळीचं पाणी' हा कैलास दौंड यांचा ललित लेख संग्रह प्रसिद्ध आहे.अंदमानचा प्रवास हे प्रवासवर्णन अंनत कराड यांनी लिहिलेले आहे.
आत्मकथनासारखा लेखन प्रकारही डॉ. सुभाष शेकडे 'हाणला कोयता झालो मास्तर' , सत्यभामा जाधवर (सत्यभामा), अंबादास केदार(तारांबळ) यांनी ताकदीने हाताळला आहे. विवेक उगलमुगले यांनी लिहिलेले शोध माणूसपणाचा' हे व्यक्तीचित्रणपर पुस्तकही प्रसिद्ध आहे.स्व. आमदार ना. ग. तथा बाबुजी आव्हाड यांचे चरित्र प्रा. डॉ. शंकर चव्हाण यांनी लिहुन प्रकाशित केले आहे याचाही उल्लेख या ठिकाणी करणे महत्त्वाचे वाटते. भास्कर बडे यांनी संघर्षयात्री गोपिनाथ मुंढे हे छोटेखानी चरित्र लिहिल आहे. प्रा. डॉ. रामकृष्ण दत्तात्रेय बदने यांनी बोलू काही थोरांविषयी, विचारधन यशस्वी जीवनाचे ही पुस्तके लिहिल असून त्यांचे नागार्जुन के कथा साहित्य में जनवादी चेतना हे संशोधनपर पुस्तक प्रसिद्ध आहे. राजयोगी महंत भगवानबाबा, कर्मयोगी संत वामनभाऊ, संघर्षयोगी स्व. गोपीनाथ मुंढे साहेब, श्री. रेणुकादेवी महात्म्य, श्री. संत रत्नमाला ही ग्रंथ संपदा प्रा. डॉ. राजकुमार घुले यांनी लिहिली आहे. श्रीक्षेत्र भगवानगडाचे महंत न्यायाचार्य श्री नामदेव महाराज शास्त्री यांनी त्यांच्या अभ्यासपुर्ण लेखणीतून ज्ञानेश्वरी विशेष चिंतन व ज्ञानेश्वरी पराग परामर्श , ज्ञानेश्वरीतील अर्जुन एक चिंतन ,अतुलनीय ग्रंथसंपदा सिद्ध केली आहे. स्व. के. टी. तांंदळे (संत भगवानबाबा जीवन व कार्य), नुकतीच कृष्णा नागरे यांनी संत भगवानबाबा यांच्या जीवन कार्यावर तर विठ्ठल दहिफळे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील राजकारणातील वंजारी समाजाचा सहभाग या संबंधातील विषयावर पीएचडी साठी संशोधन कलले आहे.
आजच्या मराठी बालसाहित्याच्या प्रांतात एकनाथ आव्हाड यांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांचे बालसाहित्यातील योगदान फार मोठे आहे. बोधाई, गंमत गाणी, अक्षरांची फुले, शब्दांची नवलाई, छंद देई आनंद हे बालकवितासंग्रह व आनंदाची बाग, एकदा काय झालं!, खळाळता अवखळ झरा हे बालकथासंग्रह त्यांनी लिहीले आणि ते बालवाचकांना आवडलेले आहेत. त्यांनी मला उंच उडू दे हा नाट्यछटासंग्रह तर मजेदार कोडी, आलं का ध्यानात?,खेळ आला रंगात हे काव्यकोडी संग्रह तसेच मिसाईल मॅन हे चरीत्र अशी विपुल बालसाहित्य निर्मिती केली. इथे एकनाथ आव्हाड यांच्या काही निवडक बालसाहित्य पुस्तकांचीच नावे दिलेली आहेत. कैलास दौंड यांचे माझे गाणे आनंदाचे हा बालकवितासंग्रह व जाणिवांची फुले हा बालकथासंग्रह प्रसिद्ध आहे.लता गुठे यांचे इटुकले पिटूकले, चांदणबाग बालकवितासंग्रह व बीनभिंतीची शाळा हा बालकथासंग्रह प्रसिद्ध आहे. भास्कर बडे यांचे अंजिमाय ही बाल कादंबरी, विवेक उगलमुगले यांचे दाट साईचे गाव, हॅप्पी होम, रोजनिशी एका चिमुरडीची, ओन्ली फॉर चिल्ड्रन हे बालकवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. रामदास केदार यांनी बालकथा आणि बालकवितासंग्रह लिहिले आहेत बन्याची शाळा, चिमणी चिमणी खोपा दे, कपाटातले पुस्तक, डोळ्यात दाटले पाणी ही त्यांची नावे. गंप्या गुराखी ही बालकादंबरीही त्यांनी लिहिली आहे. बाबू हा अलकनंदा आंधळे यांचा बाल कथासंग्रह प्रकाशित आहे. धमाल बालगाणी, बाल शिदोरी ही नागनाथ पाटलोबा बडे यांची बालसाहित्य विषयक पुस्तके आहेत.
यातील काहींना राज्य वाङमय पुरस्कारही मिळालेले आहेत. गणिता सारख्या विषयातही छाया खेडकर या गणित विषयाच्या निष्णात शिक्षिकेने गणिताच्या मुलभूत संकल्पना, गणिताच्या मुलभूत संकल्पना (३५०० प्रश्न) , काव्य गणित, काव्य उखाणे असे दर्जेदार पुस्तके लिहिली आहेत. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांत ही पुस्तके ही लोकप्रिय आहेत. स्व. ॲड बी. ई. आव्हाड यांचीही कायदे विषयक ग्रंथांची विपूल संपदा आहे.
एकुणच व्यापक समाजातील केवळ एकाच घटकाचा वेगळा विचार करून वाङ्मयीन दृष्या फारसे होणार नसले तरी त्या घटकातील लिहीणाऱ्यांना प्रेरणा मिळण्याची शक्यता आहे.
~~
~~
डॉ. कैलास दौंड
kailasdaund@gmail.com
Mo. 9850608611
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा