पोस्ट्स

जानेवारी, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बालकथा

   •  कापसाची मुलगी   दिवाळी होऊन पंधरादि झालते. शेतात कपाशीची बोंड उलारली होती. यंदा पाऊस बरा झाल्याने पाने देखील हिरवीगार होती. डोक्यावर चटकणारं उनं वाढत होतं. कुढं मुढं कापूस वेचणीला सुरूवात झालेली होती. कमरेला मिळेल त्या धुडक्याची ओटी बाधून हिरव्या रानातील पांढरा कापूस वेचणाऱ्या बाया अगदी कपाशीच्या बियाण्याच्या पिशवी वरील चित्रासारख्या दिसत होत्या. अंगावर पडणारं उन, लागणारी तहान आणि बोटांच्या शेंड्याला टोचणाऱ्या कपाशीच्या नकट्या, हातावर ओरबडणारे काड्यांचे ओरखडे मात्र कुणाचही लक्ष वेधून घेत नव्हते. कारण हे काम चपाटीनं करायच काम होतं. आपापल्या रानातील कापूस वेचण्याचं जुगाड जो तो जमवत होता आणि रोजंदारीनं कापूस वेचायला जायचं म्हटलं तरी आठ रूपये किलोचा भाव असायचा. गावातील बरेच जण शनिवार - रविवार कडे डोळे लाऊन बसलेले होते. कारण शनिवारी दुपारी आणि रविवारी शाळेला असणारी सुट्टी. या दिवशी बऱ्याच घरची शाळकरी मुलं कापूस वेचायला जायची. तर काही घरचाच कापूस वेचायची. त्यातही काही बऱ्या घरची मुलं सुट्टीतही कापूस वेचायलाही जात नसत‌ . काही आईबाप स्वतः रोज कष्ट करत असुन...