• छंद देई आनंद : सर्जनशील आनंदाचा ठेवा.डॉ कैलास दौंड

• छंद देई आनंद : सर्जनशील आनंदाचा ठेवा. डॉ कैलास दौंड प्रसिद्ध बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांचा 'छंद देई आनंद' हा बालकविता संग्रहास नुकताच साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. छानदार ,बोधप्रद बेचाळीस बालकवितांचा हा संग्रह त्यांनी 'बालकवितेचे गाणे मुलांना सहज गुणगुणायला लावणारे दीपक पाटेकर यांना स्नेहपूर्वक' भेट केला आहे. पहिल्याच कवितेत ते झाडांचे आणि पाखरांचे गाणे गातात. त्यामुळे ते गाणे हसणाऱ्या, बागडणाऱ्या लहान- थोर साऱ्यांचे होऊन जाते. 'मॉनिटर' या कवितेतील एक मुलगा वर्गाचा मॉनिटर होतो आणि तो वर्गाच्या भल्यासाठी जबाबदारीने काम करायचे ठरवतो. त्यामुळे त्याचे बाबा त्याला शाबासकी देतात आणि त्याच्याबद्दल विश्वासही व्यक्त करतात. लहानग्यांचा चांगुलपणा अधिक वाढीस लागावा याकरिता मोठ्यांचा त्यांच्यावरील विश्वासही महत्त्वाचा असतो. कल्पनारम्यता, कल्पनेच्या जगात हरवून जाणे हा बालकांचा स्वभावच असतो. 'गुजगोष्टी' नावाच्या कवितेत फुलांच्या बागेतील फुले आपसात बोलत असतात. गुलाब, चाफा, चमेली, गुलछबू, गुलछडी, नि...