• छंद‌ देई आनंद : सर्जनशील आनंदाचा ठेवा.डॉ ‌कैलास दौंड

• छंद‌ देई आनंद : सर्जनशील आनंदाचा ठेवा.
डॉ ‌कैलास दौंड

     प्रसिद्ध बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांचा 'छंद देई आनंद' हा बालकविता संग्रहास नुकताच साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. छानदार ,बोधप्रद बेचाळीस बालकवितांचा हा संग्रह त्यांनी 'बालकवितेचे गाणे मुलांना सहज गुणगुणायला लावणारे दीपक पाटेकर यांना स्नेहपूर्वक' भेट केला आहे.
   पहिल्याच कवितेत ते झाडांचे आणि पाखरांचे गाणे गातात. त्यामुळे ते गाणे हसणाऱ्या, बागडणाऱ्या लहान- थोर साऱ्यांचे होऊन जाते. 'मॉनिटर' या कवितेतील एक मुलगा वर्गाचा मॉनिटर होतो आणि तो वर्गाच्या भल्यासाठी जबाबदारीने‌ काम करायचे ठरवतो. त्यामुळे त्याचे बाबा त्याला शाबासकी देतात आणि त्याच्याबद्दल विश्वासही व्यक्त करतात. लहानग्यांचा चांगुलपणा अधिक वाढीस लागावा याकरिता मोठ्यांचा त्यांच्यावरील विश्वासही महत्त्वाचा असतो.
        कल्पनारम्यता, कल्पनेच्या जगात हरवून जाणे हा बालकांचा स्वभावच असतो. 'गुजगोष्टी' नावाच्या कवितेत फुलांच्या बागेतील फुले आपसात बोलत असतात. गुलाब, चाफा, चमेली, गुलछबू, गुलछडी, निशिगंध, मोगरा, सदाफुली, पारिजातक, तगर, कमळ ही सारी फुले आपापली वैशिष्ट्ये सांगतात. आपसात गुजगोष्टी करतात. फुलांची ही कुजबुज कान देऊन ऐकली तरच ऐकू येऊ शकते. 'मी आहे झाड' या कवितेत माडाचे झाड स्वतःची ओळख करून देते; आत्मवृत्तात्मक कवितेचे हे छानदार उदाहरण आहे.
           जीवनात काही गोष्टी, काही कौशल्य माणसाला अवगत असायलाच हवीत. त्यापैकीच पोहणे हे एक कौशल्य होय. 'शाबासकी' नावाच्या बालकवितेतील मुलाला पोहण्याची आवड आहे. त्या आवडीपाई त्याने कित्येकदा आईची बोलणी खाल्ली आहेत पण एकदा पोहण्याच्या स्पर्धेत भाग घेतल्यावर त्याला बक्षीस मिळते आणि आईचा राग कमी होतो. एकदा नदीत बुडणाऱ्या एका मुलाला तो वाचवतो. हे जेव्हा आईला कळते तेव्हा ती त्याला मायेने कुरवाळते. या कामासाठी त्याला राष्ट्रपती पदक मिळते. परंतु या मुलाला सगळ्यात जास्त आनंद त्याचाच होतो की आपला छंद एका मुलाचा जीव वाचवण्याच्या कामी आला.
     'शोधू आनंदाच्या वाटा' या कवितेमध्ये मुले रायगड जिल्ह्याचे पर्यटन करून येतात. माथेरान, वरद विनायक, महाडचे चवदार तळे, रायगड किल्ला ,मुरुड जंजिरा जलदुर्ग, अलिबागचा समुद्र किनारा ही सारी ठिकाणी ते‌ पाहून येतात. कर्नाळा अभयारण्य, घारापुरीची लेणी, भिरा, भिवपुरी, खोपोली येथील जलविद्युत केंद्र,थंड हवेचे ठिकाण माथेरान अशी काही ठिकाणी मात्र या कवितेतून सुटलेली आहेत.
           'लाखांमधील एक' या कवितेमध्ये स्वभावाने प्रेमळ आणि वागण्यात नेक असलेला एक मित्र भेटतो. अशा मित्राचा त्याच्या मित्रांना अभिमानच वाटत असतो. त्याच्यासाठी लिहिताना-
            'अभ्यासाच्या वेळी अभ्यास
             खेळाच्या वेळी खेळ 
             अभ्यास आणि खेळाचा 
              छान साधतो ताळमेळ'
अशा ओळी कवी एकनाथ आव्हाड सहज लिहून जातात. 'ताई आमची भारी' या बालकवितेत छोट्या भाऊला आपली ताई खूप भारी वाटते. लहान मुलांना प्रेमाने वागणारे, त्यांच्याशी बोलणारे आणि त्यांना सहजपणे शिकवणारे शिक्षकही खूप आवडत असतात. अशाच एका शिक्षिकेची ओळख 'आमच्या मुळे बाई' या कवितेतून होते. 'सप्तसूर' या बालकवितेतून मोजक्या शब्दात विविध वाद्यांची ओळख होते. आकाशाची 'नवलनगरी' देखील एका कवितेतून भेटते. 
     'रात्रीच्या चंद्राचा 
      पाहावा थाट 
       चांदण्यांशी खेळतो 
       जणू सारीपाट.'
अशा ओळी मनाला गुंतवून ठेवतात. कॉम्प्युटर आणि कनेक्टिव्हिटी याची गरज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातच वाढत आहे. त्यामुळे साहजिकच कम्प्युटर हा मुलांचा नवा मित्र बनला आहे. मात्र कम्प्युटरमध्येच गुंतून पडण्यापेक्षा पुस्तकांशी जवळीक करावी. वाचनाची भूक वाढवावी ही शिकवण कवी 'विरंगुळा' नावाच्या कवितेतून देतो. तो लिहितो-
         ' विरंगुळ्याचे क्षण माझे
           पुस्तकांनी होती गंधित
           लिहितो मी कथा कविता
            माझ्या सगळ्या धुंदीत.'
वाचनाने दिलेली निर्मितीची ताकद या कवितेतून सहजपणे सांगितली आहे. 'ग्रंथसखा' ही अशीच आणखी एक कविता. तिच्यातून ज्ञानेश्वरी, अभंगगाथा,भागवत, महाभारत,रामायण, दासबोध,केकावली,गीताई,शाकुंतल, गीतारहस्य,गीतांजली, गीतरामायण, माझी जन्मठेप,ययाती,कऱ्हेचे पाणी, अष्टदर्शने, श्यामची आई,जैत रे जैत,अपूर्वाई,विशाखा,सलाम,मेंदी या मराठी भाषेतील प्रसिद्ध पुस्तकांची नावे येतात. 'दोस्ती माझी पुस्तकांशी' ही देखील पुस्तकांची उपयुक्तता सांगणारी छान कविता आहे.
'तिरंगा' या कवितेत राष्ट्रध्वजाची विस्ताराने‌ ओळख होते. 'छोटासा शाहीर' कवितेत शाहिराचे कार्य आल्याने मुलांना शाहिरी माहित होण्यास मदत होईल.
    मांजर, कुत्रा अशा प्राण्यांची ओळख बालकांना लवकरच होते. त्याला कुत्र्याचे पिल्लू पाळावेसे वाटते. 'लाडका' कवितेतील मुलाने एक कुत्र्याचे पिल्लू आणून वाढवले आहे. 'सगुणाबाई'कवितेमध्ये बाळाची आणि सगुना चिमणीची गट्टी जमते तर 'उंच भरारी' कवितेतील पोपट मुलाला आवडतो, तो मुलगा त्याला खाऊ घालतो. पण तो पोपट म्हणतो-       
       'बंदीवानाला
       नको नुसतं खाणं 
        नको असतं त्याला 
       पारतंत्र्यातलं जीणं.'
स्वातंत्र्याचे महत्त्वही या कवितेतून कळते.
         कवी एकनाथ आव्हाड मुंबईसारख्या महानगरामध्ये राहतात. महानगरामध्ये अनेक समस्या सुद्धा असतात परंतु मुलांना मुंबईची ओळख करून देताना‌ 'नवलाई' कवितेत ते खूप सकारात्मकतेने ओळख करून देतात हे फार महत्त्वाचे आहे.
        बालवाचकांना काहीतरी नाविन्यपूर्ण बोध देणे हा हेतू कवी एकनाथ आव्हाड यांच्या मनात अनेकदा असतोच. साहजिकच तो त्यांच्या कवितेतून सतत भेटीस येतो. त्यांचा 'शब्दांची नवलाई' सारखा अत्यंत महत्त्वाचा बालकवितासंग्रह देखील याची साक्ष देतो. 'छंद देई आनंद' हा बालकवितासंग्रह ही याला अपवाद नाही. 'आमच्या घरी येते' या बालकवितेतून ते दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक, त्रैमासिक, षण्मासिक, वार्षिक या नियतकालिकांच्या प्रकारांची ओळख करून देतात.
    लहान मुलांना मोठेपणी तू कोण होणार? असा प्रश्न विचारला की बऱ्याचदा त्यांचे उत्तर हे वेगवेगळे असते. याचे कारण म्हणजे त्यांचे कुतूहल आणि जिज्ञासा होय. त्याला कधी अग्निशामक दलाचा जवान व्हायचे असते तर कधी संशोधक व्हायचे असते; कधी तो अभिनेता बनू इच्छितो तर कधी उत्तम वक्ता ; कधी त्याला वृत्त निवेदक व्हायचं असतं तर कधी कधी त्याला एखाद्या संस्थेचा संस्थाचालक व्हायचे असते. कधी सुंदर मूर्ती पाहून त्याला शिल्पकार व्हावेसे वाटते तर कधी चित्रकार व्हावेसे वाटते. कधी लेखक व्हावेसे वाटते तर कधी संपादक व्हावेसे वाटते. कधी शेतकरी व्हावेसे वाटते तर कधी विमान चालवणारा वैमानिक सुद्धा व्हावेसे वाटते. आई त्याला त्यासाठी चांगला अभ्यास करायला सांगते.
         'घरातलं झाड' या कवितेत आईला घरातल्या झाडाची सुंदरशी उपमा दिली आहे.
       'मी हसता 
       हसते आई
       झाडासारखी ती 
       बहरून जाई.'
'परीताई' कवितेत एका लहानग्याला स्वप्नात परीताई भेटते. शेवटी तो परीताईकडे जादूची छडी मागतो. त्याला छडीचा साऱ्यांना भाग दाखवायचा असतो, खोडी काढेल त्याचे नाक नकटे करायचे असते. त्याचा हा मनसुबा ऐकून परीराणी हसते आणि झोप मोडताच त्याला समोर आई दिसते.
    'काळजाचा तुकडा' या कवितेतून पत्र लेखनाचे महत्त्व कळते. 'फळांची सभा' मध्ये संत्रे,केळे,फणस,कलिंगड ही फळे त्यांची आणि त्यांच्या गावाची ओळख करून देतात. 'छटा रंगांच्या' या बालकवितेत शेतमळ्यातील पाणी, 

• छंद‌ देई आनंद : सर्जनशील आनंदाचा ठेवा.
डॉ ‌कैलास दौंड

     प्रसिद्ध बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांच्या 'छंद देई आनंद' या बालकवितासंग्रहास नुकताच साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला आहे. छानदार ,बोधप्रद बेचाळीस बालकवितांचा हा संग्रह त्यांनी 'बालकवितेचे गाणे मुलांना सहज गुणगुणायला लावणारे दीपक पाटेकर यांना स्नेहपूर्वक' भेट केला आहे. जवळपास तीस वर्षांपासून बालसाहित्य लेखन करणाऱ्या कवीचा बालकवितासंग्रह म्हणून या संग्रहाकडे पहावे लागते. हा त्यांचा चौदावा बालकवितासंग्रह आहे‌. याखेरीज त्यांनी बालकथा,नाट्यछटा चरित्र या प्रकारातही लेखन केलेले आहे.
  'छंद देई आनंद' मधील पहिल्याच कवितेत ते झाडांचे आणि पाखरांचे गाणे गातात. त्यामुळे ते गाणे हसणाऱ्या, बागडणाऱ्या लहान- थोर साऱ्यांचे होऊन जाते.'मॉनिटर' या कवितेतील एक मुलगा वर्गाचा मॉनिटर होतो आणि तो वर्गाच्या भल्यासाठी जबाबदारीने‌ काम करायचे ठरवतो. त्यामुळे त्याचे बाबा त्याला शाबासकी देतात आणि त्याच्याबद्दल विश्वासही व्यक्त करतात. लहानग्यांचा चांगुलपणा अधिक वाढीस लागावा याकरिता मोठ्यांचा त्यांच्यावरील विश्वासही महत्त्वाचा असतो.
         कल्पनारम्यता, कल्पनेच्या जगात हरवून जाणे हा बालकांचा स्वभावच असतो. 'गुजगोष्टी' नावाच्या कवितेत फुलांच्या बागेतील फुले आपसात बोलत असतात. गुलाब, चाफा, चमेली, गुलछबू, गुलछडी, निशिगंध, मोगरा, सदाफुली, पारिजातक, तगर, कमळ ही सारी फुले आपापली वैशिष्ट्ये सांगतात. आपसात गुजगोष्टी करतात. फुलांची ही कुजबुज कान देऊन ऐकली तरच ऐकू येऊ शकते. 'मी आहे झाड' या कवितेत माडाचे झाड स्वतःची ओळख करून देते; आत्मवृत्तात्मक कवितेचे हे छानदार उदाहरण आहे. 
            जीवनात काही गोष्टी, काही कौशल्य माणसाला अवगत असायलाच हवीत. त्यापैकीच पोहणे हे एक कौशल्य होय. 'शाबासकी' नावाच्या बालकवितेतील मुलाला पोहण्याची आवड आहे. त्या आवडीपाई त्याने कित्येकदा आईची बोलणी खाल्ली आहेत पण एकदा पोहण्याच्या स्पर्धेत भाग घेतल्यावर त्याला बक्षीस मिळते आणि आईचा राग कमी होतो. एकदा नदीत बुडणाऱ्या एका मुलाला तो वाचवतो. हे जेव्हा आईला कळते तेव्हा ती त्याला मायेने कुरवाळते. या कामासाठी त्याला राष्ट्रपती पदक मिळते. परंतु या मुलाला सगळ्यात जास्त आनंद त्याचाच होतो की आपला छंद एका मुलाचा जीव वाचवण्याच्या कामी आला. 'छंद देई आनंद' या शीर्षकाच्या कवितेत विविध छंदांचा परिचय होतो. त्याचबरोबर-
           'छंदामुळे होते रंजन
           होते मन ताजेतवाने
           नवनिर्मितीच्या आनंदापुढे
          आकाशही वाटते ठेंगणे.'
ही आनंददायी शिकवण मिळते

     'शोधू आनंदाच्या वाटा' या कवितेमध्ये मुले रायगड जिल्ह्याचे पर्यटन करून येतात. माथेरान, वरद विनायक, महाडचे चवदार तळे, रायगड किल्ला ,मुरुड जंजिरा जलदुर्ग, अलिबागचा समुद्र किनारा ही सारी ठिकाणी ते‌ पाहून येतात. कर्नाळा अभयारण्य, घारापुरीची लेणी, भिरा, भिवपुरी, खोपोली येथील जलविद्युत केंद्र,थंड हवेचे ठिकाण माथेरान अशी काही ठिकाणी मात्र या कवितेतून सुटलेली आहेत.
             'लाखांमधील एक' या कवितेमध्ये स्वभावाने प्रेमळ आणि वागण्यात नेक असलेला एक मित्र भेटतो. अशा मित्राचा त्याच्या मित्रांना अभिमानच वाटत असतो. त्याच्यासाठी लिहिताना-
            'अभ्यासाच्या वेळी अभ्यास
             खेळाच्या वेळी खेळ 
             अभ्यास आणि खेळाचा 
              छान साधतो ताळमेळ'
अशा ओळी कवी एकनाथ आव्हाड सहज लिहून जातात. 'ताई आमची भारी' या बालकवितेत छोट्या भाऊला आपली ताई खूप भारी वाटते. लहान मुलांना प्रेमाने वागणारे, त्यांच्याशी बोलणारे आणि त्यांना सहजपणे शिकवणारे शिक्षकही खूप आवडत असतात. अशाच एका शिक्षिकेची ओळख 'आमच्या मुळे बाई' या कवितेतून होते. 'सप्तसूर' या बालकवितेतून मोजक्या शब्दात विविध वाद्यांची ओळख होते. आकाशाची 'नवलनगरी' देखील एका कवितेतून भेटते. 
     'रात्रीच्या चंद्राचा 
      पाहावा थाट 
       चांदण्यांशी खेळतो 
       जणू सारीपाट.'
अशा ओळी मनाला गुंतवून ठेवतात. कॉम्प्युटर आणि कनेक्टिव्हिटी याची गरज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातच वाढत आहे. त्यामुळे साहजिकच कम्प्युटर हा मुलांचा नवा मित्र बनला आहे. मात्र कम्प्युटरमध्येच गुंतून पडण्यापेक्षा पुस्तकांशी जवळीक करावी. वाचनाची भूक वाढवावी ही शिकवण कवी 'विरंगुळा' नावाच्या कवितेतून देतो. तो लिहितो-
         ' विरंगुळ्याचे क्षण माझे
           पुस्तकांनी होती गंधित
           लिहितो मी कथा कविता
            माझ्या सगळ्या धुंदीत.'
वाचनाने दिलेली निर्मितीची ताकद या कवितेतून सहजपणे सांगितली आहे. 'ग्रंथसखा' ही अशीच आणखी एक कविता. तिच्यातून ज्ञानेश्वरी, अभंगगाथा,भागवत, महाभारत,रामायण, दासबोध,केकावली,गीताई,शाकुंतल, गीतारहस्य,गीतांजली, गीतरामायण, माझी जन्मठेप,ययाती,कऱ्हेचे पाणी, अष्टदर्शने, श्यामची आई,जैत रे जैत,अपूर्वाई,विशाखा,सलाम,मेंदी या मराठी भाषेतील प्रसिद्ध पुस्तकांची नावे येतात. 'दोस्ती माझी पुस्तकांशी' ही देखील पुस्तकांची उपयुक्तता सांगणारी छान कविता आहे.
'तिरंगा' या कवितेत राष्ट्रध्वजाची विस्ताराने‌ ओळख होते. 'छोटासा शाहीर' कवितेत शाहिराचे कार्य आल्याने मुलांना शाहिरी माहित होण्यास मदत होईल.
    मांजर, कुत्रा अशा प्राण्यांची ओळख बालकांना लवकरच होते. त्याला कुत्र्याचे पिल्लू पाळावेसे वाटते. 'लाडका' कवितेतील मुलाने एक कुत्र्याचे पिल्लू आणून वाढवले आहे.

 'सगुणाबाई'कवितेमध्ये बाळाची आणि सगुना चिमणीची गट्टी जमते तर 'उंच भरारी' कवितेतील पोपट मुलाला आवडतो, तो मुलगा त्याला खाऊ घालतो. पण तो पोपट म्हणतो-       
       'बंदीवानाला
       नको नुसतं खाणं 
        नको असतं त्याला 
       पारतंत्र्यातलं जीणं.'
स्वातंत्र्याचे महत्त्वही या कवितेतून कळते.
      कवी एकनाथ आव्हाड मुंबईसारख्या महानगरामध्ये राहतात. महानगरामध्ये अनेक समस्या सुद्धा असतात परंतु मुलांना मुंबईची ओळख करून देताना‌ 'नवलाई' कवितेत ते खूप सकारात्मकतेने ओळख करून देतात हे फार महत्त्वाचे आहे.
        बालवाचकांना काहीतरी नाविन्यपूर्ण बोध देणे हा हेतू कवी एकनाथ आव्हाड यांच्या मनात अनेकदा असतोच. साहजिकच तो त्यांच्या कवितेतून सतत भेटीस येतो. त्यांचा 'शब्दांची नवलाई' सारखा अत्यंत महत्त्वाचा बालकवितासंग्रह देखील याची साक्ष देतो. 'छंद देई आनंद' हा बालकवितासंग्रह ही याला अपवाद नाही. 'आमच्या घरी येते' या बालकवितेतून ते दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक, त्रैमासिक, षण्मासिक, वार्षिक या नियतकालिकांच्या प्रकारांची ओळख करून देतात.
    लहान मुलांना मोठेपणी तू कोण होणार? असा प्रश्न विचारला की बऱ्याचदा त्यांचे उत्तर हे वेगवेगळे असते. याचे कारण म्हणजे त्यांचे कुतूहल आणि जिज्ञासा होय. त्याला कधी अग्निशामक दलाचा जवान व्हायचे असते तर कधी संशोधक व्हायचे असते; कधी तो अभिनेता बनू इच्छितो तर कधी उत्तम वक्ता ; कधी त्याला वृत्त निवेदक व्हायचं असतं तर कधी कधी त्याला एखाद्या संस्थेचा संस्थाचालक व्हायचे असते. कधी सुंदर मूर्ती पाहून त्याला शिल्पकार व्हावेसे वाटते तर कधी चित्रकार व्हावेसे वाटते. कधी लेखक व्हावेसे वाटते तर कधी संपादक व्हावेसे वाटते. कधी शेतकरी व्हावेसे वाटते तर कधी विमान चालवणारा वैमानिक सुद्धा व्हावेसे वाटते. आई त्याला त्यासाठी चांगला अभ्यास करायला सांगते.
         'घरातलं झाड' या कवितेत आईला घरातल्या झाडाची सुंदरशी उपमा दिली आहे.
       'मी हसता 
       हसते आई
       झाडासारखी ती 
       बहरून जाई.'
'परीताई' कवितेत एका लहानग्याला स्वप्नात परीताई भेटते. शेवटी तो परीताईकडे जादूची छडी मागतो. त्याला छडीचा साऱ्यांना भाग दाखवायचा असतो, खोडी काढेल त्याचे नाक नकटे करायचे असते. त्याचा हा मनसुबा ऐकून परीराणी हसते आणि झोप मोडताच त्याला समोर आई दिसते.
    'काळजाचा तुकडा' या कवितेतून पत्र लेखनाचे महत्त्व कळते. 'फळांची सभा' मध्ये संत्रे,केळे,फणस,कलिंगड ही फळे त्यांची आणि त्यांच्या गावाची ओळख करून देतात. 'छटा रंगांच्या' या बालकवितेत शेतमळ्यातील पाणी, झेंडू,ससा,भोपळा,टोमॅटो,आकाश,झाडे, अंधार यांच्या रंगांची ओळख पटते. 'भुतोबा' बालकवितेत प्रेमळ आणि मायाळू भूत भेटते. भूतखेता याबद्दल मुलांना खुप कुतूहल असते आणि भूतेखेते नसतात पण भूतांच्या गोष्टी असतात हेही त्यांना माहीती असते.
        ' गर्वाचे घर खाली ' या कवितेत सूर्य आणि वारा यांच्या भांडणात वाऱ्याचे गर्वहरण होते. 'ठकास महाठक' ही छानच अनुभवाची कविता.
'मीच झालो पतंग ' मध्ये नभाचा राजा होऊन फिरण्याची मौज येते. 'खरंतर' कवितेत पाऊस,इंद्रधनू,झाड,फळ, सूर्य कसे येतात ते सांगतांनाच -
           'गाणे कसे येते
           येते ओठातून
           नाही नाही ते येते
           मनाच्या आतून'
हे सांगायलाही कवी एकनाथ आव्हाड विसरत नाहीत. 'गाणारा वर्ग' या कवितेत पोवाडा, लावणी, भावगीत, लोकगीत, भक्तीगीत ,प्रार्थना ,गझल, कोळीगीत ,नाट्यगीत ,समूहगीत गाणारी मुले भेटतात. त्यात माधव आहे, राजू आहे, अहमद आहे, टीना आहे, जोसेफ आहे, रुखसाना आहे, सुखविंदर आहे, रिटा आहे. 
      'अद्दल घडली' निसर्गाचा कृतज्ञ स्विकार शिकवणारी कविता तर 'मैत्री असावी तर अशी ' चतूराईचा पाठ देणारी कविता! 'मनात फुलते बाग' या बाल कवितेत गाव खेड्यातील सुंदर वातावरणाचा साक्षात्कार होतो. 
         एकूण बेचाळीस कविता असलेला एकनाथ आव्हाड यांचा 'छंद देई आनंद' हा कवितासंग्रह बालकांच्या पसंतीस उतरेल असा आहे. 'लाडका','सगुणाबाई','उंच भरारी' या कवितेतून भुतदयेचा अनुभव येतो. ही कविता आजच्या काळाशी सुसंगत आहे. तिच्यात लय,ताल असून भाषेचा साधेपणा देखील आहे.
            एकनाथ आव्हाडांची बालकविता आणि बालसाहित्य सर्वच बोधपर आहे. असे असूनही ते प्रचारकी , बोजड आणि बालमनावर दडपण वाढवणारे वाटत नाही कारण त्यात एक सहजसुलभता आहे, गेयता आहे. बालमनाची आणि त्यांच्या वृत्ती प्रवृत्तीची सखोल जाण असणारे एकनाथ आव्हाड हे बालकांच्या मनातील ओळखणारे मनकवडे बालसाहित्यिक आहेत. आव्हाडांच्या बालकवितांनी पूर्वासुरींच्या व समकालीनांचेही बालकवितांचे संस्कार पचवलेले आहेत हे 'माझे गाणे' , 'मी कोण होणार?','फळांची सभा' अशा बालकवितांवरून दिसते. या कवितामध्ये यमकांचा प्राधान्याने आणि खुबीनू वापर केलेला आढळतो. एकनाथ आव्हाडांच्या साध्या शैलीचा या ठिकाणी‌ प्रत्यय येतो. मूल्यशिक्षण,सदवर्तन, नवी माहीती देणारी ही कविता काव्यात्म गुणांनी साधारण असली तरी मराठी बालसाहीत्यात मौलिक भर घालणारी आहे. बडोदे येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांची विश्लेषक प्रस्तावना या बालकवितासंग्रहाला लाभली आहे. दिलीपराज प्रकाशनाने प्रकाशित केलेला हा कवितासंग्रह किशोरवयीन मुलांनी अवश्य वाचावा असाच आहे.
~~~
डॉ. ‌कैलास रायभान दौंड 
मु.सोनोशी पो.कोरडगाव ता.पाथर्डी जि.अहमदनगर 
पिन ४१४१०२
भ्रमणध्वनी:9850608611 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षणयात्री नरेंद्र गौतम

अविरत शिक्षिका : स्पृहा इंदू

शिक्षणयात्री : कीर्ती काळमेघ-वनकर