भूमीनीष्ठ शिक्षणयोगी : प्राचार्य डॉ.जी.पी.ढाकणे
भूमीनिष्ठ शिक्षणयोगी : प्राचार्य डॉ. जी.पी.ढाकणे. पाथर्डीच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक पटलावरील बाबुजी आव्हाड महाविद्यालय हे अत्यंत महत्त्वाचे नाव. एखाद्या महानगरात शोभावे असे हे महाविद्यालय विस्तृत , प्रशस्त आणि सुंदर तर आहेच पण ही सुंदरता वाढवण्यात येथील गुणी प्राध्यापकांचा मोठा वाटा आहे. 1966 साली स्थापन झालेल्या या महाविद्यालयाला(जनता महाविद्यालय हे आधीचे नाव.) आरंभापासूनच उत्कृष्ट प्राचार्य लाभले. यामागे कॉ. बाबुजी आव्हाड मामा यांची दूरदृष्टी निश्चितच दिसून येते.गेल्या दिड तपापासून या महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाची धुरा सांभाळणारे प्राचार्य डॉ. जी.पी.ढाकणे (गंगाधर पंढरीनाथ ढाकणे) 31 मे रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्या निमित्ताने हा लेख. प्राचार्य डॉ जी.पी.ढाकणे यांचा जन्म 1962चा.शेवगाव तालुक्यातील मुर्शदपूर तथा धावणवाडी हे त्यांचे गाव.याच गावात त्यांचे चौथी पर्यंतचे शिक्षण झाले.विद्यालयीन शिक्षण शेवगाव येथे झाले तर महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी अहमदगरच्या महाविद्यालयात घे...