पोस्ट्स

जून, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कथान्वय

इमेज
दुर्मिळ निसर्ग रूपे आणि लोककथा      आपल्या पर्यावरणात प्रचंड प्रकारची विविधता आहे. ही विविधता जशी जीवसृष्टीच्या बाबतीत आहे तशीच ती भौगोलिक दृष्ट्या देखील आहे. कुठे पेमगिरी सारख्या गावात विस्तीर्ण असे वडाचे झाड दिसते. तर कुठे उंच उंच कळसुबाई सारखे शिखर दिसते ! कुठे प्रचंड खोल दऱ्या , कुठे नागफणी सारखे कडे. कुठे रांजण खडकातून वाहणारी नदी तर कुठे जिवंत पाण्याचा झरा यासारखी कितीतरी विभिन्न भूरूपे आपल्याला वेगवेगळ्या भागात पहावयास मिळतात. या आणि अशा भूरूपांना पाहून माणसाला त्या भूरूपाच्या निर्मिती विषयी कल्पना कराव्याशा वाटल्या असणार. अशी भूरूपे भव्यदिव्य आणि जवळपास एकमेव ठरतील अशी असल्याने कुठल्या तरी देव देवतेच्या चमत्काराशिवाय ती निर्माण झाली असणे शक्य नाही असे सामान्य माणसाला वाटणे स्वाभाविक होते. पूर्वीच्या काळी शिक्षणाचा अभाव आणि सुविधेची उणीव असल्याने ही भूरूपे कशी निर्माण झाली याबद्दल फारशी माहिती नसल्याने माणसांनी ज्या कल्पना केल्या, त्या वास्तवदर्शी नसल्या तरी लोकमनाचे प्रतिनिधित्व घडवणाऱ्या होत्या. त्या रंजक देखील होत्या. माणसांनी निसर्गातील अशा दुर्मिळ रूपांशी आपल्...