खारूताईचे जंगल आणि इतर गोष्टी
बालसाहित्यात कुठला तरी एकच रस असावा असा अट्टाहास बालसाहित्याचे फार काही भले करणारा खचितच नाही. मुळात बालसाहित्य वाचनीय हवे. बालकांच्या ज्या वयोगटासाठी ते लिहीलेले आहे त्या वयोगटातील बालकांच्या भावविश्वाशी आणि मनोवृत्तीशी तादात्म्य पावणारे ते असावे. 'खारूताईचे जंगल आणि इतर गोष्टी' हा बालकथासंग्रह एक जानेवारी २५ रोजी छापून उपलब्ध होईल. हे माझे बालसाहित्याचे चौथे पुस्तक आहे. बत्तीस वर्षाचा बालकांचा सहवास, त्यांच्या अनुभवविश्वाच्या, विचारविश्वाच्या आणि परीसरविश्वाच्या परीचयाचा कस बालसाहित्य लेखनात लागला आहे. या बालकथासंग्रहातील बालकथा किशोर मासिक, गोवनवार्ताचे हुप्पा हुय्या दिवाळी अंक, लाडोबा मासिक इत्यादी मधून पूर्वप्रकाशित असून बालवाचकांपर्यंत सुट्या सुट्या स्वरूपात गेलेल्या आहेत. साहित्य चपराकचे घनश्याम पाटील तथा आमचे दादा यांनी बालवाचकांसाठी लाडोबा मासिक सुरू करून बालवाचकांसाठी मराठीत अत्यल्प असलेल्या नियतकालीकात मौलिक योगदान देणे सुरू केले. या प्रकल्पाचा एक भाग म्हणून 'लाडोबा' प्रकाशन सुरू करायचे नक्की केले. त्यासाठी पहिले पुस्तक म्हणून ' खारूताईचे जंगल ...