पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

निबंध स्पर्धा

माझी मराठी, माझा अभिमान.  माता, मातृभूमी आणि मातृभाषा स्वर्गापेक्षाही सुंदर असतात. माझ्या मराठी भाषेचा गोडवा हा अमृताशी पैज जिंकणारा आहे. आईच्या दुधाबरोबरच मातृभाषेचे संस्कार होत असतात. मराठी भाषेचे तसेच संस्कार मराठी बोलणाऱ्या लोकांवर होतात. इथल्या दऱ्याखोऱ्यातून आणि ग्राम तसेच नागर संस्कृतीतून बोलली जाणारी माझी मराठी ही एक समृद्ध भाषा आहे. आईची ममता, पित्याची जबाबदारी, समाजाचे संस्कार आणि भूमीची सहनशीलता घेऊन येणारी माझी मराठी भाषा मराठी मनाला समृद्ध करते.       ही मराठी भाषा शतकानुशतके चालत आलेल्या लोककथा आणि लोकगीतातून प्रवाही झालेली आहे. श्रवणबेळगोळ, नाणेघाट आणि अक्षीच्या शिलालेखातून तिने अमीट  ठसा उमटवला आहे. शाहिरांच्या पोवाड्यांनी, संतांच्या अभंग, भारुडे आणि गवळणी तसेच ग्रंथांनी ती समृद्ध झालेली आहे. ती नवरसांनी युक्त असून माणसांना जोडणारी आहे. माझी मराठी समतेचा जयघोष करणारी असून ती जाती, धर्म, पंथ यावरून कोणताही भेदभाव तिच्या लेकरांमध्ये करत नाही. जिचा मोह परदेशातून आलेल्या लोकांनाही होऊन त्यांनीही मराठी शिकण्याची प्रेरणा घेतली. फादर स्टीफन यांनी म...