पोस्ट्स

डिसेंबर, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

म. फुले विद्यालय, भेट

इमेज
वाचन प्रेरणा दिन

काठी जीवंत झाली

○ काठी जिवंत झाली .  डॉ.कैलास दौंड। kailasdaund@gmail.com भ्र.ध्व.9850608611          प्रो. सदाशिव शंकरन नामांकित वनस्पती शास्त्रज्ञ होते. त्यांचा सर्वाधिक वेळ वनस्पतींच्या सहवासात व संशोधनात जात असे. ते जगभरातील महत्त्वाच्या अशा अनेक जंगलात जाऊन व संशोधनासाठी राहुन आलेले होते. नव्यानेच दिसणार्‍या वनस्पतींच्या प्रजातींचे त्यांना खूप कुतूहल असे. या कुतुहलातूनच त्यांनी आजवर जवळपास पन्नास वनस्पतींचा शोध लावला होता. या वनस्पतींचे विशेष नोंदवले होते.त्यातील काही वनस्पती औषधी गुणधर्म असणाऱ्याही होत्या. त्यांच्या या मौलिक संशोधनाचा देशविदेशात गौरव करण्यात आला होता. वनस्पती विषयक संशोधनपर लेख असणाऱ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिकातून त्यांचे वनस्पती संशोधनाचे लेख नेहमीच प्रसिद्ध होत असत. अर्थातच संशोधक म्हणून त्यांचा मोठा दबदबा होता. नव्या संशोधकांना देखील त्यांचे कायमच मार्गदर्शन असे. त्यामुळे ते नव्या व जुन्या सर्वच संशोधकात प्रिय होते. वयाने जरी ते थकलेले होते तरी संशोधनासाठी एखाद्या जंगलात जायचे म्हटले की त्यांच्यात जणू तारुण्...

गाव :उब आणि धग

गाव : ऊब आणि धग (लेखांक पाचवा डिसेंबर १८ साठी) ● गावाच्या नदीचे अवखळ पाणी पाऊसपाण्याची काळजी आणि आगोठ साधल्यावर होणारा आनंद ही शेतकर्‍यांच्या सुखाची चरमसीमा. सारे दरवर्षी घडणारेच, सवयीचे आणि अंगवळणी पडलेलेही पण तितकेच नवीन वाटणारेही! पाऊस पडो की न पडो तरी नक्षत्रे आणि त्यांना लाभलेली वाहने यावरून पर्जन्याच्या रूपाचे अंदाज लावण्यातही शेतकर्‍यांच्या हात कोणी धरणार नाही. पाऊसपाण्यानं शिवार भिजावा , धरत्रीला अभिषेक घडावा, त्या अभिषेकाच्या अगणित जलधारांचे जलौघ बणून प्रवाही व्हावेत. त्यांचे खळाळ राना-शिवारात निनादावेत नि त्या वाहत्या पाण्याच्या चाहुलीने रानावनातील जीव आपापली तृष्णा शमवण्यासाठी नदीवर येवोत. नदीच्या काठावर लोकवस्ती वाढीस लागो, माणसांचे जीवन सुखकर होवो एक नवी संस्कृती उदकाचेनी मिसे वाढीस लागो. असा आशीर्वाद देण्यासाठी कोणी भाग्यवंत लाभला नाही तरी गावाला हे सारं द्यायला निसर्ग काही थांबला नाही. त्याच्याशी एकरूप होऊन जगणार्‍या शेतकर्‍यांची भाषा त्यालाच नाही तर आणखी कोणाला कळणार! गावाला बराचसा डोंगर आहे. त्या डोंगराला गावाच्या बाजूने उतार आहे. काही झाडेही या...

कविता आणि शब्द

इमेज
कविसंमेलन बातमक