पोस्ट्स

जुलै, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे
इमेज
                     थेंब पावसाळी धरेवरी ऊन्हाचे साम्राज्य चाललेले रानात माथे तरूंचे सुकून झुकलेले तशात पावसाळा बाप होऊन आला माळावरी तयाचा झळकतो मुक्त शेला. घनगर्द सावल्यांनी अचलास घेरलेले अरण्य अन् उभे उसासे सोडलेले जळात तटाकाच्या मुक्त विहारतो पक्षी गोंदून तशीच जातो एक अनामिक नक्षी. कणा ताठून उभी अंबराई वृद्ध ओली डोहात कातळाच्या झरा ओततो पखाली दऱ्यातुनी गहीरी शीळ कानात येते मंतरूनी मनाला दूर रानात नेते. डोंगरात राऊळांच्या हिरवळ भोवताली अलवार फुलांची पखरण घातलेली जाळीत हेकळीच्या कुजबुज साद कानी थेंब पावसाळी वेडा रानात गाई गाणी.                ~~~                ~~~         डॉ. कैलास दौंड       (kailasdaund@gmail.com ) ● सावळया मातीला      सावळ्या मातीला      जहाला वापसा      पेरणीचा ठसा      अंगोपांगी.   ...

तुडवण : मराठी कादंबरी

इमेज
तुडवण  : मराठी कादंबरी                                   डाॅ. कैलास दौंड लिखीत तुडवण कादंबरी मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, या प्रतिष्ठित प्रकाशन संस्थेकडून लवकरच प्रसिद्ध होत आहे. मराठी साहित्य  विश्वात या कादंबरीचे जोरदार स्वागत होईल अशी अपेक्षा आहे. आजच्या  काळातील जगण्याला भिडणारे साहित्य लेखन हे कैलास दौंड यांचे लेखन वैशिष्ट्य असल्याने 'तुडवण' ची प्रतिक्षा आहे. सुमारे दहा वर्षापूर्वी प्रकाशित झालेली 'कापूसकाळ' ही कादंबरी वाचकांच्या पसंतीस उतरलेली आहे.