• 'शब्दांची नवलाई' : भाषिकभान समृद्ध करणारा बालकवितासंग्रह.

• 'शब्दांची नवलाई' : भाषिकभान समृद्ध करणारा बालकवितासंग्रह. •डॉ. कैलास दौंड साधारणपणे व्याकरण हा भाषाभ्यासातील रूक्ष घटक. त्याचा रूक्षपणा कमी व्हावा यासाठी कार्यात्मक पद्धतीने व्याकरण शिकवायला सुरुवात केली गेली. व्याकरणातील नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद व या चारही शब्दजातीचे उपप्रकार तसेच भाषाभ्यासातील वाक्रचार, म्हणी, समुहदर्शक शब्द, प्राणी पक्षी यांच्या घरांची नावे, यमक असलेले शब्द, जोडशब्द, उपमादर्शक शब्द, अलंकारिक शब्द, ध्वनीदर्शक शब्द, एकाच शब्दाचे भिन्न अर्थ, समानार्थी शब्द, विरूद्धार्थी शब्द, विरामचिन्हे, पत्रलेखन हे सगळे सोप्या आणि रंजक पद्धतीने शिकायला मिळाले तर! कवितेतुनच हे शिकायला नि अनुभवायला मिळाले तर कित्ती धमाल येईल नाही का? ही अनोखी किमया साधली आहे प्रसिद्ध बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांनी. नुकताच त्यांचा ' शब्दांची नवलाई' ...