•आत्मस्वराची आत्मसंवादपूर्ण अभिव्यक्ती : आगंतुकाची स्वगते. प्राचार्य डाॅ. किसन पाटील डाॅ. कैलास दौंड यांचा उसाच्या कविता, वसाण, भोग सरू दे उन्हाचा, अंधाराचा गाव माझा या चारही संग्रहानंतरचा ' आगंतुकाची स्वगते ' पाचवा काव्यसंग्रह म्हणजे त्यांच्या काव्यलेखन सातत्य आणि उर्जाशील शब्द शक्तीचा जीवनवादी असा एक प्रवास आहे. ' आगंतुक' म्हणजे अतिथी, पाहुणा, आकस्मिक, अनपेक्षित, अवचितपणे आलेला व्यक्ती, वेळ किंवा घटना इत्यादी अर्थ होऊ शकतो. नेहमी राहणारा नव्हे तो, नवखा, उपरा, फिरस्ता वाटसरू, पांथस्थ, परकीय असा ही अर्थ प्राप्त होतो. डाॅ. कैलास दौंड यांच्या संग्रहाच्या शीर्षकातील 'आगंतुकाची स्वगते 'याचा लक्षार्थानुसार भूमीपुत्रांना आगंतूक करून टाकणारी व्यवस्था असा ही एक अर्थ प्रकट होतो. 'स्वतःच्या घरी दुरचा पाहुणा मी' असा एक काव्य संवाद आहे. जगाचा पोशिंदा असा कसा या अर्थव्यवस्थेचा बळी ठरला?'खाऊजा...