•आत्मस्वराची आत्मसंवादपूर्ण अभिव्यक्ती : आगंतुकाची स्वगते.

प्राचार्य डाॅ. किसन पाटील
डाॅ. कैलास दौंड यांचा उसाच्या कविता, वसाण, भोग सरू दे उन्हाचा, अंधाराचा गाव माझा या चारही संग्रहानंतरचा ' आगंतुकाची स्वगते ' पाचवा काव्यसंग्रह म्हणजे त्यांच्या काव्यलेखन सातत्य आणि उर्जाशील शब्द शक्तीचा जीवनवादी असा एक प्रवास आहे. ' आगंतुक' म्हणजे अतिथी, पाहुणा, आकस्मिक, अनपेक्षित, अवचितपणे आलेला व्यक्ती, वेळ किंवा घटना इत्यादी अर्थ होऊ शकतो. नेहमी राहणारा नव्हे तो, नवखा, उपरा, फिरस्ता वाटसरू, पांथस्थ, परकीय असा ही अर्थ प्राप्त होतो.
डाॅ. कैलास दौंड यांच्या संग्रहाच्या शीर्षकातील 'आगंतुकाची स्वगते 'याचा लक्षार्थानुसार भूमीपुत्रांना आगंतूक करून टाकणारी व्यवस्था असा ही एक अर्थ प्रकट होतो. 'स्वतःच्या घरी दुरचा पाहुणा मी' असा एक काव्य संवाद आहे. जगाचा पोशिंदा असा कसा या अर्थव्यवस्थेचा बळी ठरला?'खाऊजा ' मुळे जे जागतिक व्यवस्था बदलाचे पडसाद उमटले त्यामध्ये मूळ मालक 'उपरा' झाला हे कळत का नाही? सभोवतालचे प्रखर वास्तव, बदलती अर्थव्यवस्था, भ्रष्ट राजकीय अवस्था, प्रशासनातील शोषणाची कारणे आणि आस्मानी-सुलतानी अशा संकटांनी हा भूमीचा मालक लाचार होऊन भांडवलशाही - सावकारी प्रवृत्तीचा ऋणको होऊन 'आगंतुक' का झाला? अशा काही सर्वसामान्य, परंतु कळीच्या प्रश्नांना वाचा फोडून ही 'स्वगते' आंतल्या आंत दबलेल्या आवाजाचे दुःखीत स्वर मुखर करणारे ठरतात. अशा भयाण वास्तवाचे भयंकर टोक म्हणजे शेतकरी 'आत्महत्या ' होतात. शेतकरी पुनर्वसनाची केवळ आश्वासने (कोरडी ) दिली जातात. त्याच्या तोंडाला उष्टी पाने पुसली जातात. त्याला 'वाचवणं महत्वाचं' आहे अशी कविची धारणा आहे. जमीनीचे वाद - वाटप आणि 'खाते फोड' या मुळे 'कुणब्याचे मन ' वावधानी होऊन, दलाल कसे लुटतात याची प्रचिती येऊन 'सल' सारखी बोचत राहते. 'वावर पडिक ठेवलं तर' येणारी दुर्दशा आणि बांधावरची भांडणे कविच्या अस्वस्थ मनातील नि:श्वासिते होऊन ती एका असहाय, आगंतुक पाहुण्यांची 'स्वगते' होऊन प्रकट होतात.
'नदीकाठ' आणि 'दिस - मास ' या मधील कविता आशावादी जीवनाच्या आणि परंपरांच्या शाश्वत मूल्यांनी तसेच प्रबोधन - परिवर्तनाच्या नव्या जाणिवांनी अधोरेखित करतात. 'युगाच्या अस्वस्थतेला ' समजून घेताना, 'वाढत चाललेल्या कोलाहलाचा' परामर्श घेताना भवतालाच्या बोथट संवेदना आणि व्याकूळता -भयाण वास्तवामुळे कवीमनाच्या संवेदनशील, भावपूर्ण आणि काव्यात्म जाणिवांना शब्दांच्या कोंदणात मांडण्याचा प्रयत्न करतात. ही सर्जनशील, सुसंवेद्य आणि वास्तवाच्या विविध छटांना मुखर करणारी चिंतनपूर्ण परंतु चिंताग्रस्त मनाची तगमग वाटते.
भाषेतील सजगता, मांडणीची सहजता, प्रकटीकरणाची तत्परता आणि आत्मस्वरातून अभिव्यक्त होऊ पाहणारी आत्मसंवादपूर्ण 'स्वगते' म्हणजे डाॅ. कैलास दौंड यांची ही कविता आहे. पूर्व प्रसिध्दीचे अवकाश घेऊन ही 'स्वगते' समष्टीरूप होऊन क्षणभर आत्मसंवाद, आत्मशोध आणि बोध घेण्यास वाचकांना उपलब्ध झाली आहेत. ' आगंतुकाची स्वगते ' या संग्रहाचे स्वागत. कवी डाॅ. कैलास दौंड यांचे हार्दिक अभिनंदन!
•आगंतुकाची स्वगते : कवितासंग्रह
•कवी : डाॅ. कैलास दौंड
•प्रकाशक : चपराक प्रकाशन, पुणे
•प्रथमावृत्ती : १२जानेवारी २०२१
•पृष्ठे : ९६. मूल्य : ११०
•मुखपृष्ठ : प्रमोदकुमार अणेराव
~~~
प्राचार्य डाॅ. किसन पाटील
जळगाव
(भ्रमणध्वनी 9890612228)
•आत्मस्वराची आत्मसंवादपूर्ण अभिव्यक्ती : आगंतुकाची स्वगते.
प्राचार्य डाॅ. किसन पाटील
डाॅ. कैलास दौंड यांचा उसाच्या कविता, वसाण, भोग सरू दे उन्हाचा, अंधाराचा गाव माझा या चारही संग्रहानंतरचा ' आगंतुकाची स्वगते ' पाचवा काव्यसंग्रह म्हणजे त्यांच्या काव्यलेखन सातत्य आणि उर्जाशील शब्द शक्तीचा जीवनवादी असा एक प्रवास आहे. ' आगंतुक' म्हणजे अतिथी, पाहुणा, आकस्मिक, अनपेक्षित, अवचितपणे आलेला व्यक्ती, वेळ किंवा घटना इत्यादी अर्थ होऊ शकतो. नेहमी राहणारा नव्हे तो, नवखा, उपरा, फिरस्ता वाटसरू, पांथस्थ, परकीय असा ही अर्थ प्राप्त होतो.
डाॅ. कैलास दौंड यांच्या संग्रहाच्या शीर्षकातील 'आगंतुकाची स्वगते 'याचा लक्षार्थानुसार भूमीपुत्रांना आगंतूक करून टाकणारी व्यवस्था असा ही एक अर्थ प्रकट होतो. 'स्वतःच्या घरी दुरचा पाहुणा मी' असा एक काव्य संवाद आहे. जगाचा पोशिंदा असा कसा या अर्थव्यवस्थेचा बळी ठरला?'खाऊजा ' मुळे जे जागतिक व्यवस्था बदलाचे पडसाद उमटले त्यामध्ये मूळ मालक 'उपरा' झाला हे कळत का नाही? सभोवतालचे प्रखर वास्तव, बदलती अर्थव्यवस्था, भ्रष्ट राजकीय अवस्था, प्रशासनातील शोषणाची कारणे आणि आस्मानी-सुलतानी अशा संकटांनी हा भूमीचा मालक लाचार होऊन भांडवलशाही - सावकारी प्रवृत्तीचा ऋणको होऊन 'आगंतुक' का झाला? अशा काही सर्वसामान्य, परंतु कळीच्या प्रश्नांना वाचा फोडून ही 'स्वगते' आंतल्या आंत दबलेल्या आवाजाचे दुःखीत स्वर मुखर करणारे ठरतात. अशा भयाण वास्तवाचे भयंकर टोक म्हणजे शेतकरी 'आत्महत्या ' होतात. शेतकरी पुनर्वसनाची केवळ आश्वासने (कोरडी ) दिली जातात. त्याच्या तोंडाला उष्टी पाने पुसली जातात. त्याला 'वाचवणं महत्वाचं' आहे अशी कविची धारणा आहे. जमीनीचे वाद - वाटप आणि 'खाते फोड' या मुळे 'कुणब्याचे मन ' वावधानी होऊन, दलाल कसे लुटतात याची प्रचिती येऊन 'सल' सारखी बोचत राहते. 'वावर पडिक ठेवलं तर' येणारी दुर्दशा आणि बांधावरची भांडणे कविच्या अस्वस्थ मनातील नि:श्वासिते होऊन ती एका असहाय, आगंतुक पाहुण्यांची 'स्वगते' होऊन प्रकट होतात.
'नदीकाठ' आणि 'दिस - मास ' या मधील कविता आशावादी जीवनाच्या आणि परंपरांच्या शाश्वत मूल्यांनी तसेच प्रबोधन - परिवर्तनाच्या नव्या जाणिवांनी अधोरेखित करतात. 'युगाच्या अस्वस्थतेला ' समजून घेताना, 'वाढत चाललेल्या कोलाहलाचा' परामर्श घेताना भवतालाच्या बोथट संवेदना आणि व्याकूळता -भयाण वास्तवामुळे कवीमनाच्या संवेदनशील, भावपूर्ण आणि काव्यात्म जाणिवांना शब्दांच्या कोंदणात मांडण्याचा प्रयत्न करतात. ही सर्जनशील, सुसंवेद्य आणि वास्तवाच्या विविध छटांना मुखर करणारी चिंतनपूर्ण परंतु चिंताग्रस्त मनाची तगमग वाटते.
भाषेतील सजगता, मांडणीची सहजता, प्रकटीकरणाची तत्परता आणि आत्मस्वरातून अभिव्यक्त होऊ पाहणारी आत्मसंवादपूर्ण 'स्वगते' म्हणजे डाॅ. कैलास दौंड यांची ही कविता आहे. पूर्व प्रसिध्दीचे अवकाश घेऊन ही 'स्वगते' समष्टीरूप होऊन क्षणभर आत्मसंवाद, आत्मशोध आणि बोध घेण्यास वाचकांना उपलब्ध झाली आहम
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा