माझे गाणे आनंदाचे ॥ पुस्तक परीक्षण प्रकाश रामचंद्र क्षीरसागर

पुस्तक परीक्षण प्रकाश रामचंद्र क्षीरसागर -------------------------------------- माझे गाणे आनंदाचे माझे गाणे आनंदाचे हा कैलास दौंड यांचा बालकवितासंग्रह. शिक्षक असल्यामुळे कैलास दौंड यांना मुलांच्या आवडीनिवडी आणि छंदांची नाडी सापडलेली आहे. कैलास दौंड यांच्या या संग्रहात एकूण ३७ कविता आहेत. या कविता विविध छंदातील आहेत. विशेष म्हणजे मुलांना गुणगुणता याव्यात अशा त्या अल्पाक्षरी आहेत. ग्रामीण परिसरात त्यांचे बरेच आयुष्य गेले असल्याने ग्रामीण परिसर झाडे वेली आणि फुले पानांबरोबर पशुपक्षी येणे स्वाभाविक आहे. या संग्रहाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या संग्रहातील प्रत्येक कवितेला पूरक आणि आकर्षक असे चित्र आहे. लहान मुलांच्या मनातील भाव ओळखून त्या पद्धतीचे लेखन करणे तसे कठीण त्यातूनही आजकालच्या नव्या पिढीतील मुलांचे भावविश्व वेगळेच आहे. या संग्रहातील बालनायक किंवा नायिका या मधल्या पिढीतील आहेत. थोडे शहरीकरण होत असतानाच्या या कविता असाव्यात असा अंदाज त्या वाचताना येतो. म्हणजे नव्या सहस्रकापूर्वीच्या काही दशकातील वातावरणात वाढलेल्या निरागस मुलामुलींच्य भावविश्...