माझे गाणे आनंदाचे : डॉ. रं. म. कदम, मराठी विभाग, अगस्ती महाविद्यालय अकोले

मुलांच्या कल्पना विश्वाचा खजिना बाल कवितासंग्रह ‘माझे गाणे आनंदाचे’ प्रा. डॉ.रंजना मधुकर कदम डॉ.कैलास दौंड हे मराठी साहित्यातील महत्वाचे आणि मानाचे नाव. त्यांच्या कविता, कथा, कादंबरी इ. वास्तवदर्शी साहित्य वाचकांना आनंद तर देतेच त्याचबरोबर अंतर्मुख करते, विचार करायला भाग पाडते. त्यांनी लिहिलेला बालकवितासंग्रह ‘माझे गाणे आनंदाचे’ हा मुलांच्या बाल मनाला सहज आकर्षित करणारा, रमवणारा, आनंदमय विश्वात घेऊन जाणारा, त्यांचा उत्साह वाढवणारा आणि त्यांना सहजरीत्या खूप काही शिकवणारा आहे. लहान मुलांना नवनवीन, मनोरंजक, आकर्षक कल्पना आवडतात. म्हणूनच लहान मुले या कविता मनापासून वाचतात. कारण या कवितासंग्रहातून लहान मुलांचे उत्साही, खेळकर, काल्पनिक, चित्रमय विश्व साकार झालेले आहे. ते बाल मनाला रमवणाऱ्या विश्वात अगदी सहजतेने घेऊन जातात. उदा. ‘गच्चीवर जेव्हा झोपली मुलं आकाश अलगत खाली आलं अनोखं विश्व मग झालं खुलं चांदण्यांची झाली मोहक फुलं’ यातून दिसून येते की, यात कवीने मुलांच्या परिचयाच्या, त्यांना माहित असणाऱ्या गोष्टी मनोरंजकपणे, मुलांना गंमत-मौज वाटेल, आनंद होईल व तेही विचार करायला ला...