नदी रुसली नदी हसली

• नदी हसली नदी रूसली : सजग करणाऱ्या लोभस कविता. डॉ. कैलास दौंड. प्रसिद्ध बालसाहित्यिक डॉ. सुरेश सावंत यांचा 'नदी हसली नदी रूसली' हा बालकवितासंग्रह सर्वार्थाने बालकांचे लक्ष वेधून घेणारा आहे. यात पर्यावरण ,प्रदुषण, निसर्ग, डोंगर, नदी, समुद्र, टीव्ही, शाळा, वाचन इत्यादी कवितेतून नवी जाणीव देऊन जातात. नदी प्रदुषण ही तर ज्वलंत समस्या. ' निसर्गाचे सारे नियम माणसांनी मोडले शहरातील सांडपाणी नदीमध्ये सोडले. ' किंवा ' रेतीचे तिचे धन चोरांनी चोरुन नेले नदीपात्रात खड्डे करुन तिला जखमी केले.' 'अन्नदाता ' कवितेतील शेतकरी स्वत:ला भूमीचा प...