विचार सूत्र देणारे बालसाहित्य : 'माझे गाणे आनंदाचे' आणि 'जाणिवांची फुले.' : डॉ. मीरा शेंडगे (सोलापूर)

विचार सूत्र देणारे बालसाहित्य : 'माझे गाणे आनंदाचे' आणि 'जाणिवांची फुले.' • डॉ. मीरा शेंडगे (सोलापूर) अवघड लिहिणं सोपं पण सोपं लिहिणं अवघड असते. तसेच काहीसे बालसाहित्याचे आहे. बालसाहित्य लिहिणे हे तुलनेने अवघड समजले जाते. खरं तर बाल साहित्य लिहिणे, उपलब्ध होणे हे बालकाची अजाण पिढी घडवण्यासाठी आवश्यक आहे. एकत्र कुटुंब पद्धतीत आजी-आजोबा हे संस्काराचे, ज्ञानाचे प्रमुख केंद्र होते. नकळत मुलांचे भावनिक, बौद्धिक, मानसिक भरणपोषण व्हायचे. आता विभक्त कुटुंब पद्धतीमुळे ही जबाबदारी पुस्तकांवर व बालसाहित्यिकांवर येऊन पडली. गेली दोन दशके डॉ. कैलास दौंड लिहीत आहेत. आता 'माझे गाणे आनंदाचे' ( बालकविता संग्रह) व 'जाणिवांची फुले' (बाल कथासंग्रह) हा संस्कारक्षम लघु कथा संग्रह अर्थात बालांसाठी त्यांनी आवर्जून प्रकाशित केला आहे. खरं तर सकस ग्रामीण साहित्य लिहिणारे डॉ. कैलास दौंड आवर्जून बालकांसाठी लिहितात हे कौतुकास्पद आहे. ते स्वतः शिक्षक असल्याने प्रत्यक्ष अध्यापनाच्या वेळी मूल्यांच्या ज्या पूर्वज्ञानावर आधारित आपण शिकवत अस...