न पोहोचलेल्या पत्रांचे मनस्वी उत्तर

प्रख्यात मराठी कादंबरीकार,कथाकार आणि कवी बाबाराव मुसळे सरांनी त्यांना न पोहोचलेल्या पत्रांना लिहीलेले हे उत्तर आहे. या उत्तरात त्यांनी पूर्वीचे पत्र ते आत्ताची ईसाधने या दरम्यानचे संक्रमण फार सुंदर रितीने उलगाडले आहे. शिवाय लहान मुलांप्रतीची त्यांची संवेदनशीलता देखील या पत्रातून ठळकपणे जाणवते. शाळकरी मुलींच्या पत्राला(की जी अजून त्यांच्या हातीही पडलेली नाहीत.) त्यांनी दिलेले उत्तर सर्वच मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक आहे. . मी(डॉ. कैलास रायभान दौंड , पदवीधर प्राथमिक शिक्षक) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हंडाळवाडी पो.ता.पाथर्डी जी.अहमदनगर या माझ्या शाळेतील इयत्ता सहावी व सातवीच्या वर्गाला पत्रलेखन शिकवतांना विद्यार्थ्यांना प्रत्यक्षानूभव देण्यासाठी पाठ्यपुस्तकात पाठ,कविता असणाऱ्या लेखक ,कवींना पत्र लिहीण्याचा उपक्रम घेतला.आणि ती पत्रे पाठवली. हा लेख 'जीवन शिक्षण 'मासिकासाठी पाठवला होता. त्यानंतर मला संपादक मंडळातील सदस्यांनी फोन करून लेखक , कवींच्या प्रतिसादाबद्दल विचारले. कुणाचाही प्रतिसाद प्राप्त नव्हता म्हणून मी विद्यार्थ्यांनी पत्र पाठवले...