बालकवितासंग्रह: आई,मी पुस्तक होईन.कवी डॉ कैलास दौंड

शिक्षणवसा, सण , मूल्यसंस्कार आणि पर्यावरण शिक्षणाचा आविष्कार - 'आई, मी पुस्तक होईन.' डॉ श्रीकांत श्रीपती पाटील म्हणजे देवाघरची फुले असे म्हटले जाते. आनंद उल्हास, उत्साह, दंगामस्ती बरोबरच शाळा आणि खेळांमध्ये मध्ये नागण्या-बागडण्यामध्ये, झाड-झाडोऱ्यात हिंडण्या फिरण्यामध्ये मुले आपला वेळ घालवतात. राग, लोभ, मोह, मत्सरापासून दूर राहून मुले आपली निरागसता आणि निष्पापता जपतात. आई वडिलांइतकेच आपल्या शाळामाऊलीवर व गुरुजींवर प्रेम करतात. शाळेमध्ये पुस्तकातील अक्षरे गिरवितात तर निसर्गाच्या उघड्या शाळेमध्ये हिंडुन फिरून डोंगर दऱ्याचे, झाडाझुडपांचे, फळाफुलांचे, पक्षी-प्राण्यांचे निरीक्षण करून आपली जिज्ञासा तृप्ती करून घेतात. तुम्ही कोण होणार ? असा प्रश्न मुलांना नेहमीच कुटुंबात, शाळेत, समाजात विचारला जातो. बऱ्याचदा लोक कौतुक करतील अशी उतरे मुले या प्रश्नाला देतात. मी फौजदार होईन, मी कलेक्टर होईन अशी उतरे देवून आपल्या निरागस मनाची आनंदलालसा पूर्ण करतात. पण खरेच लहानपणी दिलेली उत्तरे ही पाठ केल...