डॉ ‌कैलास दौंड यांचे बालसाहित्यातील योगदान

माझे गाणे आनंदाचे‌ हा डॉ.कैलास दौंड यांचा बालकविता संग्रह २०२० मध्ये प्रकाशित झाला आहे. त्या आधी ते किमान तीस वर्षांपासून कविता लेखन करत आहेत. त्यांची.  ' गोधडी' ही कविता महाराष्ट्र राज्याच्या इयत्ता आठवीच्या बालभारती पाठ्यपुस्तकात समाविष्ट आहे. त्यांच्या काही कविता आणि बालकथाही किशोर मासिकातून प्रसिद्ध झालेल्या आहेत. बालसाहित्य विषयक दिवाळी अंकातूनही त्यांच्या अनेक बालकथा प्रसिद्ध झालेल्या आहेत.

'आई,मी पुस्तक होईन'  हा बालकवितासंग्रह २०२३ च्या ऑगस्ट महिन्यात प्रकाशित झाला. त्याला अल्पावधीतच बालवाचक आणि समीक्षकांनीही मोठा प्रतिसाद दिला. कारवार (कर्नाटकचे) कवी संदेश बांदेकर यांनी या बालकवितासंग्रहातील सर्व कवितांचा कोंकणी भाषेत अप्रतिम अनुवाद केलेला आहे.
जाणीवांची फुले हा डॉ.कैलास दौंड यांचा बाल कथासंग्रह २०२१ मध्ये प्रकाशित झाला. यातील बहुतांश बालकथा महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाच्या किशोर मासिकातून प्रसिद्ध झालेल्या आहेत.
महत्त्वाचे म्हणजे या तिन्ही बालसाहित्यकृतींची समीक्षकांनी व जाणकारांनी उत्तम दखल घेतली आहे. त्यांना चिंतामण शंकर उगलमुगले बालसाहित्य पुरस्कार, सूर्यकांता देवी पोटे बालसाहित्य पुरस्कार,निर्मला मठपती बालसाहित्य पुरस्कार आणि द.कृ.सांडू बालसाहित्य पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
बालसाहित्याचे वर्तमान हे डॉ. कैलास दौंड यांचा बालसाहित्य समीक्षा विषयक पुस्तक होय. डॉ ‌कैलास दौंड हे स्वागतशील  बालसाहित्यिक आहेत. त्यांनी बालसाहित्याच्या अनेक पुस्तकांची परीक्षणे लिहीली. काही साहित्यिकांचा आढावा घेणारे लेखही लिहीले. अशा काही लेखांचा समावेश या पुस्तकात आहेत.हे पुस्तकही २०२३ मध्येच प्रकाशित झाले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षणयात्री नरेंद्र गौतम

अविरत शिक्षिका : स्पृहा इंदू

शिक्षणयात्री : कीर्ती काळमेघ-वनकर