पोस्ट्स

सप्टेंबर, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अनुभवातून शिक्षण देणाऱ्या : सुजाता नवनाथ पुरी

इमेज
अनुभवातून शिक्षण देणाऱ्या : सुजाता नवनाथ पुरी  सुजाता नवनाथ पुरी या श्रीरामपूर नगरपालिकेच्या प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून २००० मध्ये सेवेत रुजू झाल्या. मुस्लिम बहुल भागातील गरीबीने गांजलेल्या परिस्थितीतील पालकांची मुले इथल्या शाळेत येत असत. इथे त्यांनी जवळपास चौदा वर्षे सेवा दिली. येथील महिला पालकांना एकत्र करून त्यांच्यासाठी बचत गट निर्मितीची प्रेरणा त्यांनी दिली. यातून महिला पालकांना आर्थिक दृष्ट्या समृद्ध करण्याचा स्तुत्य प्रयत्न केला. नगरपालिका क्षेत्रातील महिलांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करून सर्वसामान्य महिलांना कायद्याचे बहुमोल असे मार्गदर्शन सुजाता पुरी यांनी तज्ञांमार्फत मिळवून दिले. त्याच काळात त्यांची ‘महिला संघटन’ या विषयावर आकाशवाणीवर मुलाखतही प्रसारित झाली. हे सगळे करण्यामागे महिलांमधील आर्थिक आणि सामाजिक जाणिवांची समृद्धी झाली तर त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणाप्रती त्या अधिक सजग होतील ही डोळस भावना होती.      नगरपालिका शाळेत पटसंख्ये अभावी अतिरिक्त ठरल्यानंतर सुजाता पुरी यांची सेवा जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आली. श्रीरा...

रोटरी क्लब ऑफ माजलगाव 'नेशन बिल्डर अवार्ड '

इमेज
परवा सायंकाळी 'रोटरी क्लब ऑफ माजलगाव' चे 'नेशन बिल्डर अवॉर्ड' शिक्षक पुरस्काराचे वितरण होते. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या दिवशीच हा कार्यक्रम असल्याने विशेष औचित्यही होतेच. वितरण माझ्या हस्तेच होणार असल्याने चांगले कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करता येणार याचा आनंदही होता. त्यामुळे माने शालेय काम आटोपल्यावर गाडीने सव्वा दोन तासात कुठेही न थांबता पोहचलो.कवीवर्य प्रभाकर साळेगावकरांनी मनःपूर्वक स्वागत केले. कार्यक्रम आटोपशीर आणि नेटका होता. अकरा गुरूजनांना सन्मानित करण्यात आले.