रोटरी क्लब ऑफ माजलगाव 'नेशन बिल्डर अवार्ड '
परवा सायंकाळी 'रोटरी क्लब ऑफ माजलगाव' चे 'नेशन बिल्डर अवॉर्ड' शिक्षक पुरस्काराचे वितरण होते. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या दिवशीच हा कार्यक्रम असल्याने विशेष औचित्यही होतेच. वितरण माझ्या हस्तेच होणार असल्याने चांगले कार्य करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करता येणार याचा आनंदही होता. त्यामुळे माने शालेय काम आटोपल्यावर गाडीने सव्वा दोन तासात कुठेही न थांबता पोहचलो.कवीवर्य प्रभाकर साळेगावकरांनी मनःपूर्वक स्वागत केले. कार्यक्रम आटोपशीर आणि नेटका होता. अकरा गुरूजनांना सन्मानित करण्यात आले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा