नरेंद्र गौतम यांचा समाजसहभागाचा ‘खर्रा’ पॅटर्न! नरेंद्र गौतम हे उच्च विद्या विभूषित शिक्षक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खर्रा केंद्र भानपूर( ता.जि.गोंदीया) या शाळेत पदवीधर प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. या शाळेची स्थापना १९५५ मध्ये झालेली असून शाळेची एकूण पटसंख्या १५३ व शिक्षक संख्या सहा आहे. शिक्षकांची इच्छाशक्ती असेल तर प्रत्येक समस्यावर मात करता येऊ शकते आणि शाळेचा विकास साधता येतो. मात्र स्वतःच्या कामासोबतच पालकांना विश्वासात घेणे गरजेचे असते. या विचारांनी नरेंद्र गौतम यांनी त्यांच्या कामाला सुरुवात केली आणि त्यात ते यशस्वी झाले. त्यांनी पाहिले की या शाळेतील विद्यार्थ्यांची अभ्यासातील प्रगती साधारण होती मात्र हे विद्यार्थी खेळात निपूण होते. सन २०१८-१९ मध्ये इयत्ता पाचवीचे अकरा विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेस बसले. नियमित अध्यापन,सराव आणि अनुधावन यामुळे त्यातून दहा विद्यार्थी उत्तीर्ण होऊन सहा विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले. त्यातील दोन विद्यार्थ्यांची शासकीय विद्यानिकेतन केळापूरसाठी निवडही झाली. प्रयत्नातील सातत्यामुळे प...
अविरत शिक्षिका : स्पृहा इंदू चेंबूर इथे १९५७ पासून दिमाखदारपणे मराठी माध्यमाची शाळा म्हणून चेंबूर उपनगरातील चेंबूर एज्युकेशन सोसायटीची प्राथमिक शाळा अनेक पिढ्यांना ज्ञानदानाचे कार्य अविरतपणे करत आहे. श्रीमती. स्पृहा सुरेश इंदू ह्या बारावी, डी.एड अशी अर्हता धारण करून १९९८ मध्ये सहाय्यक शिक्षिका म्हणून शाळेच्या सेवेत रुजू झाल्या. आज पर्यंतच्या २६ वर्षात त्यांनी शिक्षिका म्हणून केलेले कार्य उल्लेखनीय आहे. सन २००५ पर्यंत या शाळेत विद्यार्थी संख्या भरभरून असे. नंतर मराठी माध्यमाच्या शाळांना मुंबईसारख्या महानगरात घरघर लागली. पालकांचा ओढा इंग्रजी माध्यमाच्या शाळेकडे वाढू लागल्याने विद्यार्थी संख्या हळूहळू कमी होऊ लागली. स्पृहा यांनी विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या मदतीने वस्त्यावस्त्या मधील शाळाबाह्य बालके शोधून त्यांना शाळेत प्रवेशित केले. मराठी माध्यमाचे म्हणजेच मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व त्यांनी वस्तीतील घरोघरी जाऊन पालकांना समजावले. याची दखल ‘मिड डे’ ह्या इंग्रजी दैनिकाने घेतली होती. ...
विद्यार्थ्यांच्या जाणिवा समृद्ध करणाऱ्या: कीर्ती काळमेघ-वनकर. कीर्ती काळमेघ-वनकर या शिवाजी शिक्षण संस्थेच्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये भौतिकशास्त्राच्या अध्यापिका आहेत. नांदगाव खंडेश्वर सारख्या यवतमाळ ते अमरावती दरम्यान असणाऱ्या ग्रामीण भागात काम करत असताना त्यांना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबद्दल अनेक अडचणी आणि समस्या आढळून आल्या. हे विद्यार्थी सामाजिक भान, कुटूंबातील सदस्यांना समजावून घेण्याची कुवत, परीसराचे आणि निसर्गाचे आकलन, व्यसनाचे दुष्परिणाम इत्यादी बाबतीत सजग नसल्याचे त्यांना आढळून आले.त्यावर त्यांनी त्यांच्या परीने उपाय शोधण्याचा प्रयत्न केला. ‘इच्छा तिथे मार्ग’ या सूत्राने त्यांनी विद्यार्थ्यांच्या जाणिवा विकसित करण्याचा मार्ग शोधला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभ्यास, वाचन आणि डोळस समाज निरीक्षण याच्या अभावामुळे अनेक साधारण वाटणाऱ्या गोष्टी देखील माहिती नसतात. अनेकांना तर दहावी पास होऊन देखील नीटनेट...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा