वसाण : कवितासंग्रह

वसाण हा माझा दुसरा कवितासंग्रह आहे. तो २००२ या वर्षी प्रकाशित झाला. यातील कविता निसर्ग आणि सामाजिक अंगाने ग्रामीण जीवनाचे दर्शन घडवणार्‍या आहेत. अत्यंत चित्रमय शब्ददृष्ये यातुन वाचकांच्या भेटीस येतात. चंद्रमौळी या फारसे प्रसिद्ध नसणाऱ्या प्रकाशनाकडून हा कवितासंग्रह प्रकाशित झाला होता. आता लवकरच त्याची नवी आवृत्ती प्रकाशित होईल. 
                     थेंब पावसाळी
 धरेवरी ऊन्हाचे साम्राज्य चाललेले
 रानात माथे तरूंचे सुकून झुकलेले
 तशात पावसाळा बाप होऊन आला
 माळावरी तयाचा झळकतो मुक्त शेला.

 घनगर्द सावल्यांनी अचलास घेरलेले
 अरण्य अन् उभे उसासे सोडलेले
 जळात तटाकाच्या मुक्त विहारतो पक्षी
 गोंदून तशीच जातो एक अनामिक नक्षी.


 कणा ताठून उभी अंबराई वृद्ध ओली
 डोहात कातळाच्या झरा ओततो पखाली 
दऱ्यातुनी गहीरी शीळ कानात येते
 मंतरूनी मनाला दूर रानात नेते. 

डोंगरात राऊळांच्या दरवळ भोवताली 
थेंब पावसाळी वेडा रानात गाई गाणी. 

ही त्यातील एक कविता 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षणयात्री नरेंद्र गौतम

अविरत शिक्षिका : स्पृहा इंदू

शिक्षणयात्री : कीर्ती काळमेघ-वनकर