तुडवण कादंबरी : प्रकाशक बाळासाहेब घोंगडे यांची फेसबुकवरील प्रतिक्रिया.
नव्या अक्षरांचे आगमन *तुडवण* कैलास दौंड मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, मुंबई, किंमत : 300 रुपये. कैलास दौंड यांची तुडवण वाचतोय. पहिल्या पानापासून आत खेचून घेते ही कादंबरी. अवश्य वाचावी अशी ही कादंबरी. आज आम्ही दोन प्रति विकल्याही. या कादंबरीचे हस्तलिखित अगोदर वाचलेले होते. नंतर खूप बदल झालेला. पुन्हा वाचनात हे लक्षात येते. अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड, कर्जत, श्रीगोंदा, पाथर्डी, शेवगाव, श्रीरामपूर, संगमनेर तसेच बीड जिल्ह्यातील कडा, आष्टी, धनगरवाडी, घोंगडेवाडी, पाटोदा, शिरूर कासार, गेवराई परिसरात बोलली जाणारी नगरी बोली या कादंबरीतून जोरकसपणे समोर येते. राजन गवस यांच्या लेखनात नवे शब्द भरपूर सापडतात. तसेच अनेक नवे शब्द दौंड यांच्या कापूसकाळमध्येही सापडतात. अाता तुडवणमध्ये तर असे अनेक शब्द आणि शेवटी त्यांचा अर्थ अशी सूचीच कादंबरीच्या शेवटी दिलेली आहे. राजन गवस आणि नागनाथ कोत्तापल्ले या ज्येष्ठ लेखकांना ही कादंबरी अर्पण केलेली आहे. कादंबरीसाठी संपर्क बाळासाहेब घोंगडे अक्षर पुस्तकालय धायरी, बेनकरनगर पुणे - 411041 संवाद : 9834032015