तुडवण कादंबरीवरील वाचकाचा प्रकाशनपूर्व प्रतिसाद

'तुडवण' वरील जागरूक वाचकाचा प्रतिसाद. 
______________________________
 तुडवण कादंबरी प्रथम गंधाली दिवाळी अंक २०१५ मधून प्रसिद्ध झाली.  त्यानंतरच्या वर्षी याच दिवाळी अंकांतून 'जमीन' नावाने या कादंबरीचा शेवटचा भाग प्रसिद्ध झाला होता. त्यावर आणखी काम करून  आता मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, मुंबई येथून' तुडवण' प्रकाशित झालेली आहे. या वाटचालीत ही पत्रे महत्त्वाची ठरली.  
______________________________
पत्र क्र १
   स. न. वि. वि. 
       गंधाली दिवाळी अंक २०१५ मधील तुमची तुडवण कादंबरी वाचली. गरिबीमुळे, अज्ञानामुळे शोषित वर्ग इतर सुधारलेल्या समाजाकडून कसा अधिकच शोषला जातो त्याचे वर्णन तुम्ही नेमक्या शब्दात केले आहे. अक्षरशः शोषित वर्गाची प्रत्येक ठिकाणी तुडवण झालेली बघायला मिळते. त्यामुळे ते दारिद्र्याच्या खाईत अधिकच लोटले जातात. ते त्यातून हिमतीने परत परत उठायचा प्रयत्न करतात पण ते प्रयत्नही अपुरे पडतात. असे वास्तवाचे चित्रण तुम्ही छान पध्दतीने डोळ्यासमोर उभे केले आहे. 
 'तुडवण' ही कादंबरी खूप आवडली. तुमच्या पुढच्या साहित्यिक वाटचालीस माझ्या हार्दिक शुभेच्छा. 
      कळावे 
 आ. हितचिंतक वाचक 
श्रीमती हेमलता सावे. 
दहिसर,मुंबई. 
(दिनांक २५ एप्रिल २०१६)

पत्र २ (९ मार्च २०१७)

  स. न. वि. वि. 
गेल्या वर्षीच्या गंधाली दिवाळी अंक २०१५मधील 'तुडवण ' कादंबरी प्रमाणेच मला ह्या वर्षीची म्हणजे गंधाली दिवाळी अंक २०१६ मधील तुमची 'जमीन' कथा खूप आवडली. तुमच्या कथेतील प्रसंग ग्रामीण भागातील  सत्य घटनेवर आधारित असल्यासारखे वाटतात. त्याचे वर्णन तुम्ही हुबेहुब करता. प्रत्येक प्रसंग काळजाचा ठोका चुकवत असल्यासारखा वाटतो. गरीबी व अज्ञानामुळे ग्रामीण भागातील शेतकरी अधिकच संकटात व गरिबीत लोटला जातो. त्याचे वर्णन तुम्ही समर्पक केले आहे.  जणू तो अनुभव तुम्ही स्वतः घेत आहात असे वाटते. तुमची कथा वाचतांना मला ज्येष्ठ लेखक डाॅ. आनंद यादवांची आठवण झाली. 
    तुमच्या ग्रामीण कथांचा असाच बहर येत राहो. तुमच्या कथांचा व कादंबरीच्या लिखाणाच्या वाटचालीस माझ्या हार्दिक शुभेच्छा. 
कळावे 
एक वाचक 
श्रीमती हेमलता सावे.

ही कादंबरी येथे देखील मिळेल. 

बाळासाहेब घोंगडे
अक्षर पुस्तकालय
धायरी, बेनकरनगर
पुणे - 411041
संवाद : 9834032015

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षणयात्री नरेंद्र गौतम

अविरत शिक्षिका : स्पृहा इंदू

शिक्षणयात्री : कीर्ती काळमेघ-वनकर