गावातल्या साथी आणि साथ देणारे गाव. डॉ. कैलास दौंड

○ गावातल्या साथी आणि साथ देणारे गाव . डॉ. कैलास दौंड (गाव : उब आणि धग १७) ओल्या हिरव्या सजीवंत गावाला कधी दुखण्या-भाण्याचं उन लागतं. या उन्हाचा चटका बसू नये म्हणून प्रत्येक मन घाबरतं. कधी पाच - दहा वर्षानी धडकी भरवणारे रोग येतात. माणसं जमेल तसं त्याला तोंड देतात. मानमोडी, प्लेग, पटकी, स्वाईनफल्यू, चिकनगुनिया अशा साथींच्या अनेक आठवणी गावातील वयस्कर माणसांकडून ऐकायला मिळतात. दवाखाने, प्रवासाची साधने, आर्थिक उपलब्धता या साऱ्यांची कमतरता असल्याने होणारी जीवित हानी मोठीच असे. त्यातून गावात शिळा भात खाऊ नये, विटके अन्न खाऊ नये, घरात उंदीर- घुशी होऊ देऊ नयेत. बाहेरून आल्यावर पाय- हात धुऊनच घरात प्रवेश करावा अशी जागरू...