○ उंदरीन सुंदरीन : वैविध्य जपणारा बालकविता संग्रह.

○ उंदरीन सुंदरीन : वैविध्य जपणारा बालकविता संग्रह. डाॅ. कैलास दौंड 'उंदरीन सुंदरीन' हा विठ्ठल जाधव या कवीचा बालकविता संग्रह नुकताच नांदेडच्या इसाप प्रकाशनाने प्रकाशित केलेला आहे. 'पांढरा कावळा' या बालकुमार कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा साने गुरुजी राज्य वाङ्मय पुरस्कार मिळाल्यानंतरच्या विठ्ठल जाधव यांच्या या बालकविता संग्रहाकडे वाचकाचे लक्ष वेधले गेले आहे. या बालकविता संग्रहात सदतीस बालकविता असून त्या बाल ते किशोर वयोगटातील मुलांच्या भावविश्वातील व अनुभव जगतातील विषय ते जबाबदारीने घेऊन आलेले दिसतात. आई हा बालकाचा पहिला मित्र, शिक्षक, काळजीवाहक, आधार आणि सर्वस्वच असते. 'उंदरीन सुंदरीन' बालकविता संग्रहात 'आई' संबंधी 'आईचा वाढदिवस' , 'मातृॠण' , 'माझी आई' , 'आई तुझी हाक' या कविता येतात. आपल्या बाळाच्या भावनांशी ती जणू एकरूप होते. मुलांना देखील हे दिसते. 'आईचा वाढदिवस' या कवितेतील बाळ म्हणते - ...