पोस्ट्स

जानेवारी, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सुंदर व मनविभोर ' : माझे गाणे आनंदाचे' बालकाव्यसंग्रह.

इमेज
  ○ सुंदर व मनविभोर ' : माझे गाणे आनंदाचे.     प्रा. देवबा शिवाजी पाटील           डाॅ. कैलास दौंड हे  सर्वाना एक सुप्रसिद्ध साहित्यिक म्हणून सुपरिचित आहेत.  त्यांचे काव्यसंग्रह, कथासंग्रह, ललित लेख संग्रह, बालकाव्यसंग्रह, बालकुमार कथासंग्रह असे बरेच लिखाण प्रकाशित झालेले आहे. नुकताच त्यांचा 'माझे गाणे आनंदाचे' हा सुंदरसा बालकाव्यसंग्रह पैठणच्या अनुराधा प्रकाशनाने प्रकाशित केला आहे. बालसाहित्य मग ते  बालकविता असो, बालकथा असो, बालकादंबरी असो, वा बालनाटिका असो वा इतर कोणत्याही प्रकारचे बालसाहित्य असो, ते  लिहिण्यासाठी साहित्यिकाला तो वयाने मोठा असल्यास आधी बालक व्हावे लागते. जो वयाने मोठा साहित्यिक बालक होऊ शकतो तोच उत्कृष्ट बालसाहित्य लिहू शकतो. ह्या  बालकाव्यसंग्रहात कवी असेच बालक झाल्याचे पानोपानी  दिसून येते.          'माळरानी' या पहिल्याच कवितेत  बालक-बालिकांच्या खेळणे, फिरणे , नाचणे, बागडणे, खाणे, पिणे, गाणी गाणे अशा निसर्गदत्त बालभावना कवीने...

मुलांचे मनोरंजन करणारी कविता : ' माझे गाणे आनंदाचे

इमेज
    ● मुलांचे मनोरंजन करणारी कविता : ' माझे गाणे आनंदाचे '                                        - उमेश मोहिते .              ________________________        बाल मित्रांनो,खास करून मोठया प्रौढ वाचकांसाठी लिहिणारे लेखक म्हणून सुपरिचित श्री.कैलास दौंड हे लहान मुलां- मुलींसाठीही छान- छान बोधपर कथा,कविता आणि नाटूकले लिहिणारे कवी,लेखक आहेत.त्यांची केवळ मुलांसाठी लिहिलेली काही पुस्तकेही प्रकाशित झाली असून नुकतेच ' माझे गाणे आनंदाचे ' हे त्यांचे केवळ तुमच्यासाठी लिहिलेले कवितांचे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे.या पुस्तकात एकूण ३७ कविता असून या सर्वच कविता तुमच्या परिचयाच्या शाळा,गाव,उन्हाळा,पक्षी,आजी अशा विषयांवरील आहेत.दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कविता साध्या,सोप्या अशा तुमच्या सर्वांच्या परिचयाच्या ...

• बालविश्व समृद्ध करणाऱ्या कविता

इमेज
  •  बालविश्व समृद्ध करणाऱ्या कविता                                                                                                                            • अशोक लोटणकर 'माझे गाणे आनंदाचे'  हा सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. कैलास दौंड यांचा बाल कविता संग्रह अलीकडेच प्रकाशित झाला आहे. डॉ. कैलास दौंड यांनी आजवर कादंबरी, कथा, कविता, ललितलेख असे प्रौढ वाङमय विपुल प्रमाणात लिहिले आहे. मा...

माझे गाणे आनंदाचे : या बालकवितासंग्रहातील कविता सादर करतांना श्रेया.

इमेज