पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जगण्यामध्ये आणूया. (बालकविता)

इमेज
जगण्यामध्ये आणूया.  शाळेमध्ये शिकतो जे ते जगण्यामध्ये आणूया ज्ञानाचा वापर करुनी जीवन सुंदर बनवूया.  शाळेमध्ये शिकतो भाषा,  भाषेमधले व्याकरण सुयोग्य तिचा वापर करता वादाला मग कसले कारण?  वर्गामध्ये गणित शिकतो आकडेमोडही करीतो फार  जीवनामध्ये वापर करता शिल्लक राहतील पैसे चार!  बाहू स्फुरुनी इतिहास घोकतो युद्ध, लढाया तोंडपाठ गतकाळातील चुका टाळुनी मान ठेऊया सदैव ताठ.  नकाशातुन भूगोल शिकतो सागर, डोंगर, जंगल, घाट भान तयाचे राखुन चालुया जीवनाची या पाऊलवाट.  निष्कर्ष काढतो प्रयोग करूनी विज्ञानाचा घेतो धडा जगण्याला अति सोपे करण्या ज्ञानाचा तू ओत घडा.  शाळेमध्ये शिकतो आपण कला, खेळ नि कार्यानुभव वापर त्याचा सदैव करता जगणे होते रम्य अनुभव.  विविधतेने नटला आहे सभोवताली समाज सारा त्या बागेचे फूल होऊनी सुंदर सजवू भारत प्यारा ~~~~ डॉ. कैलास दौंड (टीप : चित्रे प्रतिकात्मक आहेत. त्यावर आमचा हक्क नाही) 

आगंतुकाची स्वगते' :अस्वस्थ सभोवतालचे प्रत्ययकारी चित्रण: • डॉ. दीपक सूर्यवंशी

इमेज
    • अस्वस्थ सभोवतालचे प्रत्ययकारी चित्रण: 'आगंतुकाची स्वगते'                                  •  डॉ. दीपक सूर्यवंशी              मराठी साहित्यातील प्रतिथयश कादंबरीकार आणि कवी डॉ. कैलास दौंड यांचा 'आगंतुकाची स्वगते' हा पाचवा  ग्रामीण जीवनानुभवाशी एकरूप असलेला पाचवा कवितासंग्रह.  यात  अस्वस्थ सभोवतालचे दर्जेदार नि अस्सल, प्रत्ययकारी चित्रण आहे. प्रस्तुत काव्यसंग्रहाची कवीने पहिल्या विभागात 'सल आणि ओल', दुसऱ्या 'नदीकाठ' तर तिसऱ्या विभागात 'दिस-मास’ अशा तीन भागात विभागणी केली असून त्यात अनुक्रमे आपल्या अस्वस्थ सभोवतालचे चित्र पाहून हेलावणाऱ्या मनाची अवस्था, महापुरुषांच्या विचारांच्या प्रेरणेतून प्रगत जाणिवांच्या दिशेने होणारी वाटचाल आणि याच विचारांच्या माध्यमातून सद्यकाळात उभ्या राहिलेल्या प्रश्नांची उकल भविष्यात तरी करता येईल का...

बालसाहित्य balsahitya

इमेज

तीर्थरूप ढगास...

इमेज
तीर्थरूप ढगास  पावसाचं मुळी थांबेना सत्र ढगोबाला लिहिलं पत्र मायना लिहीला, तीर्थरूप ढगास!  आता आम्हाला पाऊस बस्स!  घरं आमची पडायला लागली पीकं देखील सडायला लागली  नद्या नि नाले तुडुंब भरले कणसांना बघ कऱ्हे फुटले.  तुला हे का दिसत नाही तरी तू का थांबत नाही?  लवकर निघून जाण्याची आता तरी कर बाबा घाई!  दूर दूर निघून जा जिथे तुझी वाट पाहतात पाऊस टाक त्यांच्या हातात पीकपाणी येऊ दे शेतात.  ढगोबा तू मायाळू आहेस लोक तुझी पाहतात वाट कमी अधिक पडलास तर आमची लागते पुरती वाट!  पत्र लिहिले प्रेमाने राग मनी धरू नकोस पुढल्या वर्षी मात्र मला वाट पहायला लाऊ नकोस!  पत्र लिहून झालं पुर्ण झालं ड्राफ्टमधी जमा झालं मग माझ्या ध्यानी आलं क्लाऊडमधी पाठवून दिलं!  ~~~~

चला मुलांनो शाळेला

इमेज

२ ऑक्टोबर, म. गांधी जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

इमेज