तीर्थरूप ढगास...

तीर्थरूप ढगास 

पावसाचं मुळी थांबेना सत्र
ढगोबाला लिहिलं पत्र
मायना लिहीला, तीर्थरूप ढगास! 
आता आम्हाला पाऊस बस्स! 

घरं आमची पडायला लागली
पीकं देखील सडायला लागली 
नद्या नि नाले तुडुंब भरले
कणसांना बघ कऱ्हे फुटले. 

तुला हे का दिसत नाही
तरी तू का थांबत नाही? 
लवकर निघून जाण्याची
आता तरी कर बाबा घाई! 

दूर दूर निघून जा
जिथे तुझी वाट पाहतात
पाऊस टाक त्यांच्या हातात
पीकपाणी येऊ दे शेतात. 

ढगोबा तू मायाळू आहेस
लोक तुझी पाहतात वाट
कमी अधिक पडलास तर
आमची लागते पुरती वाट! 

पत्र लिहिले प्रेमाने
राग मनी धरू नकोस
पुढल्या वर्षी मात्र मला
वाट पहायला लाऊ नकोस! 

पत्र लिहून झालं पुर्ण झालं
ड्राफ्टमधी जमा झालं
मग माझ्या ध्यानी आलं
क्लाऊडमधी पाठवून दिलं! 

~~~~

टिप्पण्या

  1. मा.डॉ. कैलास दौंड सर आपण एक शिक्षक पूत्र व एक शिक्षक रत्ना आहात एका शिक्षकाच्या पोटी जन्म घेऊन आपण ग्रामीण जीवन व शेतकऱ्याचे दुःख दारिद्र्य या बद्दल असलेली आपल्या मनातील तळमळ पाहून खरोखर आपणसुद्धा पीचडी आहेत तरी शेतकऱ्याची जोडलेली नाळ तुटू दिली नाही.आपल्या कार्यास कोटी कोटी शुभेच्छा व सलाम

    उत्तर द्याहटवा
  2. प्रिय श्री० माऊली सर, सप्रेम नमस्कार,
    मनस्वी प्रतिक्रियेबद्दल मनपूर्वक धन्यवाद! आपणास शुभचिन्ह!

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षणयात्री नरेंद्र गौतम

अविरत शिक्षिका : स्पृहा इंदू

शिक्षणयात्री : कीर्ती काळमेघ-वनकर