जाणिवांची फुले

(पुस्तक परीक्षण ) • मुलांच्या जाणिवा विकसित करणारी- 'जाणिवांची फुले' प्रकाश रामचंद्र क्षीरसागर पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंबात आजोबा आजी, काका- काकी शिवाय एखादी आत्या अशी जाणती मंडळी असायची. ती अनुभवसमृद्ध मंडळी रोज संध्याकाळी दिवेलागणीला परवचे म्हणायची. म्हणवून घ्यायची. त्यावेळी गोष्टीही सांगायची ही मंडळी. कधी कधी झोपताना लहाग्यांना रोज गोष्टी ऐकायला आवडत. गोष्टी ऐकतच ती झोपी जात. परंतु एकविसावे शतक उजाडले तेच मुळे एकत्र कुटुंबाचे विभाजन करीतच. अर्थात विसाव्यात नव्वदीच्या दशकातच त्याची सुरुवात झाली होती. हे सर्व पुराण सांगण्याचे कारण म्हणजे ती उणीव कैलास दौंड यांच्या 'जाणिवांची फुले' या पुस्तकाने बऱ्याच अंशी दूर केली आहे. या पुस्तकात सोळा संस्कारक्षम गोष्टी आहेत. या गोष्टींतून संस्कार, विज्ञान, वाचनस...