जाणिवांची फुले : पुरस्कार

 
 'जाणिवांची फुले' ला चेंबूरच्या 'सांडू प्रतिष्ठानचा' साहित्य पुरस्कार. 

                    दत्तात्रेय कृष्ण सांडू प्रतिष्ठान , चेंबूर ,मुंबई  यांच्या कडुन  सकस मराठी  साहित्य निर्मितीला  प्रोत्साहन  मिळावे  या  उद्देशाने , उत्कृष्ट  साहित्यकृतीला प्रतिवर्षी साहित्य पुरस्कार देण्यात  येतात.१ एप्रिल २०२० ते  ३१ मार्च २०२२   या कालावधीतील साहित्य पुरस्कार दिनांक ३० ऑगस्ट रोजी सांडू प्रतिष्ठानने जाहीर केले आहेत. कथासंग्रह, कवितासंग्रह, बालसाहित्य आणि संकिर्ण अशा चार साहित्य प्रकारांना हे पुरस्कार देण्यात येतात.  'बालसाहित्य'  या साहित्य प्रकारातील पुरस्कार इसाप प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या डॉ.कैलास दौंड यांच्या 'जाणिवांची फुले ' या बालकथा संग्रहास जाहीर झाल्याचे दत्तात्रेय कृष्ण सांडू प्रतिष्ठानने कळवले आहे. पुरस्कार  वितरण  समारंभ दिवाळीनंतर मुंबई येथे होणार आहे. बालसाहित्य प्रकारातील पुरस्कार जाहीर झालेले बालसाहित्यिक असे  प्रथम.श्री. रमेश तांबे           (मुंबई ), द्वितीय. डॉ .कैलास  दौंड (अहमदनगर) तृतीय .श्री  रावसाहेब  जाधव (नाशिक ),  डॉ. सुरेश  सावंत (नांदेड). 
           'जाणिवांची फुले' हे प्रसिद्ध साहित्यिक डॉ. कैलास दौंड यांचे बालसाहित्य प्रकारातील दुसरे व बालकथा प्रकारातील पहिलेच पुस्तक आहे. 'माझे गाणे आनंदाचे' हे त्या आधीचे कवितांचे पुस्तक. 
'जाणिवांची फुले' या पुस्तकात नव्या जाणिवांच्या सोळा बालकथा आहेत. यातील बहुतांश कथा किशोर मासिकातून पूर्व प्रसिद्ध आहेत. जाणिवांची फुले या बाल कथासंग्रहात त्या एकत्रित स्वरूपात वाचायला मिळतात. या पुस्तकाला किशोर मासिकाचे कार्यकारी संपादक किरण केंद्रे यांची पाठराखण लाभलेली आहे. उमेश मोहिते, देवबा पाटील, अशोक लोटनकर, मीरा शेंडगे, किरण केंद्रे,प्रकाश क्षीरसागर आदी मान्यवर साहित्यिकांनी 'जाणिवांची फुले' पुस्तकाची समीक्षा लिहुन दखल घेतली आहे. डॉ. कैलास दौंड यांचे या पुरस्काराबद्दल डॉ. सुरेश सावंत,बाबाराव मुसळे,शंकर कसबे,अशोक कोळी, अशोक बेंखडळे,महेश मोरे, नारायण शिंदे,नागेश शेवाळकर, आनंद पुपलवाड,सदानंद पुंडपाळ, आशाताई भांड,वसुंधरा सुत्रावे, रा. रं. बोराडे आदी साहित्यिकांनी व मसाप पाथर्डी सदस्यांनी अभिनंदन केले आहे. 







                                 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षणयात्री नरेंद्र गौतम

अविरत शिक्षिका : स्पृहा इंदू

शिक्षणयात्री : कीर्ती काळमेघ-वनकर