भूमी आणि भूमिकानिष्ठ लेखकांचे आधारस्तंभ : डॉ नागनाथ कोत्तापल्ले.

• भूमिका निष्ठ लेखकांचे आधारस्तंभ डाॅ .नागनाथ कोत्तापल्ले. डॉ. कैलास दौंड. मराठी ग्रामीण साहित्य चळवळीतील ज्येष्ठ मार्गदर्शक आणि शिलेदार म्हणून आदरणीय डाॅ. नागनाथ कोत्तापल्ले सरांना महाराष्ट्र ओळखतो. विद्यार्थी प्रिय प्राध्यापक, मराठी विभाग प्रमुख, विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद चे कुलगुरू ही जशी सरांची ओळख आहे तशीच कवी, कादंबरीकार, लेखक आणि समीक्षक व भाष्यकार ही देखील सरांची ओळख आहे. या सर्वांसोबत असते ते सरांचे कमालीचे माणूसपण ! इथली भूमी आणि भूमिपुत्र माणसे हा सरांच्या जिव्हाळ्याचा आणि आस्थेचा विषय. सन. १९८९-९१ या दोन शैक्षणिक वर्षात डि. एड. साठी मी मुखेड येथे होतो. त्यावेळी डाॅ.नागनाथ कोत्तापल्ले सर मुखेडचे आहेत असे समजले. त्यावेळी ते पुणे विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख होते. दोन वर्षापूर्वी एका दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेला सरांचा मुखेडचे खूप सुंदर चित्रण असलेला लेख वाचला. मुखेड मधील नदी,...