डॉ. कैलास दौंड यांच्या 'जाणिवांची फुले ' बालसाहित्यकृतीला निर्मला मठपती साहित्य पुरस्कार प्रदान

सोलापूर येथील निर्मला मठपती फाऊंडेशन कडुन दिला जाणारा सर्वोत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार पाथर्डी येथील साहित्यिक डॉ. कैलास दौंड यांच्या जाणिवांची फुले या बालकथासंग्रहास ख्यातनाम समीक्षक प्रा. डॉ. राजशेखर शिंदे यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. शिवस्मारक सभागृहात दिनांक ३०ऑक्टोबर रोजी झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध कथाकार योगिराज वाघमारे होते. या कार्यक्रमास प्रा.डॉ. शिवाजी शिंदे, राजेंद्र भोसले यांच्यासह सोलापूर शहरातील लेखक, कवी आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
        यावेळी बोलतांना प्रा. डॉ. राजशेखर शिंदे म्हणाले की कैलास दौंड यांची 'कापूसकाळ' कादंबरी राष्ट्रीय पुरस्कारांच्या तोडीची होती मात्र आपल्याकडे केवळ साहित्यकृती दर्जेदार असुन भागत नाही ही खंत आहे. दर्जेदार बालसाहित्याच्या बद्दल त्यांनी व्यक्त केलेली खदखद साहित्याप्रतीच्या बांधिलकीचे द्योतक आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष योगिराज वाघमारे यांनीही बालसाहित्यात सामाजिक वास्तवाचा समावेश असावा अशी अपेक्षा व्यक्त केली. श्रृती श्री वडगबाळकर यांनीही डॉ. कैलास दौंड यांचे बालसाहित्य मी यापूर्वीही आपण वाचले असल्याचे नमुद केले. 
       साहित्य पुरस्कारास उत्तर देतांना डॉ. कैलास दौंड यांनी आपल्याला संवेदनशील पिढी पाहिजे असेल तर बालसाहित्याकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन बदलला पाहिजे. हे मत व्यक्त केले.( डॉ. कैलास दौंड यांचे मनोगत ). या पुरस्कार वितरण कार्यक्रमात डॉ. कैलास दौंड यांच्या 'जाणिवांची फुले ' या बालकथा संग्रहास तर सुनिताराजे पवार यांच्या कांडा या बालकादंबरी बालकादंबरी विभागातून पुरस्कार प्रदान करण्यात आला श्रीकृष्ण देवराय कादंबरीसाठी व्यंकटेश देवनपल्ली, बंगलोर व भिनवाडा कादंबरीसाठी बाळासाहेब कांबळे सातारा, ललित लेखसंग्रहासाठी डॉ. प्रतिभा जाधव यांना तर वंदना कुलकर्णी यांना अनुक्रमे अस्वस्थतेची डायरी आणि अस्वस्थ क्षणांचे देणे पुस्तकासाठी प्रदान करण्यात आला. डॉ.श्रुतीश्री वडगबाळकर यांना महायोगिनी अक्कमहादेवी या पुस्तकासाठी व प्रतिमा कुलकर्णी यांच्या सोनबावरी पुस्तकासाठी आणि स्मिता पाटील यांच्या नाही गिरवता येत कुठलीच लिपी या पुस्तकासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला. 
सभागृहातील मंचावर प्रत्येक पुरस्कार प्राप्त लेखकाचा फोटो त्याखाली पुरस्कृत पुस्तकाचा फोटो असे मोठ्या आकारातील पोस्टर्स सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. प्रवेशद्वारावर पुरस्कार प्राप्त पुस्तकाची सुंदर मांडणी केलेली होती. या कार्यक्रमासाठी मठपती कुटुबियांनी व त्यांच्या निकटवर्तीयांनी नियोजनपूर्वक परीश्रम घेतले. मठपती फाऊंडेशनचे पुरस्कार सोलापूरच्या साहित्य आणि सांस्कृतिक लौकिकात भर घालतात असे मत अनेकांनी व्यक्त केले. 
  कार्यक्रमाचे प्रास्ताविक निर्मला मठपती फाऊंडेशनचे सचिव उत्तरेश्वर मठपती यांनी केले तर आभार अध्यक्षा शिवांजली स्वामी यांनी मानले. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षणयात्री नरेंद्र गौतम

अविरत शिक्षिका : स्पृहा इंदू

शिक्षणयात्री : कीर्ती काळमेघ-वनकर