पोस्ट्स

ऑक्टोबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कवितानुवाद

इमेज
प्रसिद्ध साहित्यिक आणि अनुवादक संदेश बांदेकर  कवितानुवाद कोंकणी भाषिक कवी संदेश बांदेकर (मूळ मराठी कविता : डॉ ‌कैलास दौंड) १)तळ्यां उदाक (तळ्याचं पाणी)  तळ्यांचे उदाक निळेशार वारो सुध्दा थंडगार दोंगरातल्यान येवन मोड उदकाक म्हणता म्हाक पळय उदाक कायीत उलयना तळ्यात पडतेत रावता मोडाक मात ओगीत घाई उदकाचो हारसों फुटना काय मोड ओगीत पिसावलें झगडे करुक लागले झाडा लागली हांसुक  मोडाक लागली चाळोवुक मोडाले आता चाळवले जिगोळवणे सुरु जाले मोड मोडाक मेळ्ळे पावस जावन पडले उदा धावले शेता केरात व्होळान सांणले भान उदा सगळे एक जाले पशु पक्षी आंनदुन गेले २) मधुकर आई म्हणता म्हाका तळहातावयलो फोड आका म्हणता लाडान साखरेकिंता गोड आजी म्हणता केन्नकेन्ना दुदावयली साय आजो म्हाक आपयता  छोटा मुन्ना भाय बाब आपयत म्हाका स्मार्ट आमगेल दिवटो दोस्त म्हणात मोगान येयलो तांबडो बावटो मावशी सांगता फोनार रेजेक यो रे बाळा मास्तर म्हणता  मधुकर चुकय नाका शाळा ३)चला पोरांनो शाळेक.  कोरोनाक भिवन आमगेलो कीतलो काळ गेलो नियम पाळन्न चला पोरांनो चला पोरांनो शाळेक आँनलायनाचो आमकां येयलो कितलो तरी ...

बालपण समुद्ध करणारा कवितासंग्रह - आई मी पुस्तक होईन

इमेज
बालपण समुद्ध करणारा कवितासंग्रह - आई मी पुस्तक होईन गुलाब बिसेन, सितेपार - तिरोडा, जि. गोंदिया बालकविता आणि बालकथांच्या माध्यमातून बालसाहित्यामध्ये आपल्या वेगळी ओळख निर्माण केलेले साहित्यिक डॉ. कैलास दौंड हे मुलांसाठी सतत नाविण्यपूर्ण साहित्य निर्मिती करत आहेत. आतापर्यंत त्यांनी मुलांसाठी  'माझे गाणे आनंदाचे' आणि 'जाणिवांची फुले' अशी दोन पुस्तके लिहिलेली आहेत. नुकताच त्यांचा 'आई, मी पुस्तक होईन' हा बालकविता संग्रह प्रकाशित झाला आहे. कवी डॉ. कैलास दौंड हे ग्रामीण साहित्यिक असल्यामुळे साहजिकच त्यांच्या बालसाहित्यातही ग्रामिण जीवनाचे, अनुभवांचे प्रतिबिंब उमटलेले दिसून येते. हाच धागा पकडून त्यांनी आपल्या कवितांतून समृद्ध अशा ग्रामीण जीवनाशी बालकुमारांची नाळ जोडण्याचाही प्रयत्न केलेला दिसून येतो.  डॉ. दौड यांच्या या कवितासंग्रहाची सुरुवात  'आहे माझे रान'  कवितेने झालेली आहे.  ' डोंगराच्या पुढे   आहे माझे रान   हिरव्या रंगांत   हरपते भान' या कवितेच्या ओळी वाचकाला निसर्गाकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. कवीचे मन गावात रमणारे...

सुंदर, रंजक व उद्बोधक : 'आई मी पुस्तक होईन' बालकवितासंग्रह

इमेज
सुंदर, रंजक व उद्बोधक : 'आई मी पुस्तक होईन' बालकवितासंग्रह संपूर्ण महाराष्ट्राला बहुविध लेखन प्रकार हाताळणारे साहित्यिक म्हणून सुपरिचित झालेले नाव म्हणजे डॉ. कैलास दौंड. त्यांचा अलिकडेच प्रकाशित झालेला 'आई मी पुस्तक होईन' हा बालकवितासंग्रह वाचनात आला. या आधी त्यांचे अनेक कवितासंग्रह , कथासंग्रह, कादंबरी, ललित लेखसंग्रह, बालसाहित्यामध्ये सुध्दा बालकाव्यसंग्रह, बालकथासंग्रह असे वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य प्रकाशित झाले आहे. त्यांची सारी साहित्यसंपदा ही उद्बोधक, उत्तम, वाचनीय अशीच आहे. तसाच' आई,मी पुस्तक होईन 'हाही बालकवितासंग्रह हा मुलामुलींसाठी खरोखर संस्कारक्षम, रंजक व बोधप्रद असाच आहे.    'आई,मी पुस्तक होईन' या बालकवितासंग्रहातील पहिल्याच 'आहे माझे रान' या  कवितेतील बालक रानात रमता रमता शेतशिवारातील पिके बघून आपले भान हरपतो आणि दुःख विसरतो. ग्रामीण भागातील मुले शेतीशी किती तल्लीन झालेली असतात हे या कवितेतून दिसते. अशाच प्रकारचे बालकाचे समरसतेचे विचार 'जेव्हा' या कवितेतही  'पाहुनिया सृष्टी नवी, येते अंगी तरतरी ।।'  असे...