पोस्ट्स

एप्रिल, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मुलांचे लेखक शिक्षक : एकनाथ आव्हाड

 मुलांचे लेखक शिक्षक : एकनाथ आव्हाड        बालसाहित्यिक म्हणून सर्व महाराष्ट्रभर परिचित असलेले एकनाथ आव्हाड हे‌ प्राथमिक शिक्षक म्हणून मुंबईतील चेंबूर येथील अयोध्यानगर म.न.पा. मराठी शाळा वाशीनाका येथे गेल्या बत्तीस वर्षांपासून सेवारत आहेत. इयत्ता सहावी ते आठवीच्या वर्गाला ते मराठी आणि हिंदी विषयाचे अध्यापन करतात. स्वतः मोठे साहित्यिक असणारे शिक्षक जेव्हा शाळेतील विद्यार्थ्यांना भाषा विषय शिकवतात तेव्हा ते तेथील विद्यार्थ्यांसाठी सर्जनाच्या प्रेरणा वृद्धिंगत करणाऱ्या ठरू शकते, याचा प्रत्यय एकनाथ आव्हाड यांनी शाळेमध्ये राबवलेले वेगवेगळे उपक्रम पाहून येतो. एकनाथ आव्हाड यांचे प्राथमिक शिक्षण मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतच झाले. मोठे झाल्यावर आपण महापालिकेच्या शाळेत शिक्षक म्हणून सेवा करायची असे त्यांनी ठरवले आणि त्यांना तशी संधीही प्राप्त झाली.          आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण भाषिक अनुभव मिळावेत, त्यांचा भाषिक विकास व्हावा, त्यांच्या नवनवोन्मेषशालिनी प्रज्ञेला बळ मिळावे यासाठी ते शाळेमध्ये विविध उपक्रमांचे आयोज...