ऊसाच्या कविता राज्याबाहेर

//उसाच्या कविता // या कवितासंग्रहाचा कर्नाटक विद्यापीठ, धारवाड च्या एम. ए. अभ्यासक्रमात समावेश झाला आहे. धन्यवाद कर्नाटक विद्यापीठ मराठी अभ्यासमंडळ!  उसाच्या कविता हा माझा पहिलाच कवितासंग्रह आहे तो २००१ साली प्रसिद्ध झाला. तेव्हा तो उसतोडणी कामगारांच्या जीवनाचे चित्रण करणारा पहिलाच कवितासंग्रह होता. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे नवलेखक अनुदान मिळून पुण्यातील नीळकंठ प्रकाशनने प्रकाशित केला होता. दिवंगत थोर कवी नारायण सुर्वे, आनंद यादव यांनी या संग्रहाचे पत्र पाठवून स्वागत केले होते. प्राचार्य वसंत बिरादार सरांनी लिहिलेल्या परिक्षणानंतर हा कवितासंग्रह वाचकांपर्यंत पोहचायला खूप मदत झाली. आतापर्यंत माझे चार कवितासंग्रह प्रकाशित आहेत. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात देखील एका कवितेचा समावेश झाला होता. त्या खेरीज माॅडेल काॅलेज अभ्यासक्रमात एक कविता समाविष्ट आहे. तर कापूसकाळ या कादंबरीचा मुंबई विद्यापीठाच्या बी. ए. तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला आहे. तरी पहिल्या कवितासंग्रहास  लाभलेल्या या मानाचा मनस्वी आनंद आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शिक्षणयात्री नरेंद्र गौतम

अविरत शिक्षिका : स्पृहा इंदू

शिक्षणयात्री : कीर्ती काळमेघ-वनकर