पोस्ट्स

ऑक्टोबर, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

तुडवण मधील :राधाक्का.

 तुडवण कादंबरीमध्ये अनेक व्यक्तिरेखा आहेत. राधाक्का ही अशीच एक महत्त्वाची व्यक्तीरेखा आहे. एखाद्याला तीच कादंबरीच मुख्य नायिका वाटू शकेल इतके तिचे आस्तित्व कादंबरीभर आहे.          राधाक्काच्या व्यक्तिरेखेमधून कष्टाळू, कुटुंबवत्सल, जबाबदारीचे भान असणारी, कठिण प्रसंगातही मार्ग काढणारी आणि उद्यावर विश्वास असणाऱ्या ग्रामीण स्त्रीचे दर्शन सहजच होईल असा विश्वास वाटतो.           राधाक्काला यमुना आणि नारायण ही दोन मुले आहेत. नवनाथ हा तिचा पती शेतकरी आहे. आणि तिच्या जन्माला पुरणारा डोकेदुखीचा आजार तिला जडलेला आहे.            नारायणच्या शिक्षणानंतर त्याने अभ्यास करून नोकरीला लागावे असे तिला वाटत असते. मात्र नारायणला नोकरी मिळत नाही. (अपूर्ण ) 

तारकेश्वरगड भेट

इमेज
श्री क्षेत्र तारकेश्वरगड.  पाथर्डी पासून दहाबारा किलोमीटरवर असलेल्या परंतू बीड जिल्ह्यात असणाऱ्या डोंगरावरील सुंदर ठिकाण. येथे तारकेश्र्वराचे सुंदर मंदीर आहे. येथे वेदांताचार्य श्री. नारायण महाराज यांचे दीर्घकाळ वास्तव्य होते. त्यांचे उत्तराधिकारी महंत आदिनाथ महाराज यांनी गडावर मोठ्या प्रेमभावे स्वागत केले. 

माझे गाणे आनंदाचे

इमेज

TUDVAN.

इमेज
प्रसिद्ध चित्रकार सतिश भावसार यांनी तुडवण च्या मुखपृष्ठाचे केलेले हे स्केच आहे. त्यावरून त्यांनी  सद्ध्याचे मुखपृष्ठ साकार केले. ते सर्वांच्या पसंतीस उतरत आहे. लातुर येथील लेखक आणि चित्रकार सुरेंद्र पाटील या मुखपृष्ठावर एकदम खूश आहेत.  तुडवण च्या वाटचालीत अनेक मान्यवरांचे आशीष लाभले आहेत. गेल्या दोन वर्षापूर्वी प्रसिद्ध लेखक लक्ष्मीकांत देशमुख इकडे दौर्‍यावर असतांना त्यांनी मोठ्या आस्थेने नवीन लेखनाची विचारपूस करून तुडवणचे हस्तलिखित आत्मियतेने पाहिले. 

नवी कादंबरी : तुडवण

इमेज
तुडवण ही कादंबरी येणार असे भाकित मी २०१२ मध्येच केले होते. कादंबरी लेखनाला सुरूवात देखील केली होती. मात्र कथानक पाहिजे अशी गती घेत नव्हते. त्याच्या मागणीची पुरवापुरव करण्यात बराच वेळ जात होता. सुरूवातीचा काही भाग कथा रूपाने काही मासिकातून दिला होता.      तशातच NET परीक्षा दिली आणि त्या हेतुने मुद्दाम काही वाचन केलेले नसूनही पहिल्या प्रयत्नात पात्र झालो. Ph. D करावयाची सुप्त इच्छा मनात होतीच. PET दिली. डाॅ. डुंबरे सरांसारखे मार्गदर्शक लाभले. इ. स. २००० ते २०१० या कालखंडातील मराठी ग्रामीण कादंबरीचा चिकित्सक अभ्यास. या संदर्भात संशोधन करून २०१५ मध्ये विद्यावाचस्पती पदवी संपादन केली.       आणि पुन्हा कादंबरी कडे वळलो. या वर्षी कादंबरी लिहून झाली असे वाटले. गंधाली दिवाळी अंकांतून ती प्रकाशित झाली. २५०० रू. मानधन मिळाले. पण ही कादंबरी आपण मध्येच सोडली आहे. असे मनाला सतत वाटत राहिले. मग पुन्हा एकदा पुनर्लेखन सुरू केले. ग्रामीण तरूण, ग्रामीण स्रिया यांच्या जगण्याची लढाई, त्यातील अडथळे, सामाजिक वास्तव आणि तगधरू मानसिकता, जगण्याची उमेद, कठीण काळात ...